एक्स्प्लोर
coronavirus | लॉकडाऊनमुळे समुद्र प्रदूषणमुक्त
कारखान्यांतील दूषित रासायनिक सांडपाणी सातत्याने मुरबे दांडी नवापूर या समुद्र खाड्यांमध्ये सरसकट सोडलं जायचं. त्यामुळे या खाड्या पूर्णपणे प्रदूषित झाल्या होत्या.
![coronavirus | लॉकडाऊनमुळे समुद्र प्रदूषणमुक्त Sea pollution free due to lockdown coronavirus | लॉकडाऊनमुळे समुद्र प्रदूषणमुक्त](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/03/30210240/Mumbai-Pollution.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
पालघर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात संचारबंदी आणि लॉकडाऊन सुरू असून आजचा सहावा दिवस आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक वाईट परिणाम झाले असले तरी याचे काही चांगले परिणामही आता जाणवू लागले आहेत. अनेक कारखाने काही दिवसांपासून बंद असून रासायनिक सांडपाणी समुद्रात सोडलं जात नसल्याने किनारपट्टीवरील गावांमध्ये समाधानाचं वातावरण पाहायला मिळते. याच विशेष कारण म्हणजे येथील समुद्र किनाऱ्यावरील पाणी सध्या स्वच्छ दिसून येत आहे.
पालघर जिल्ह्यातील बोईसर तारापूर हे मोठं औद्योगिक कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात जवळपास साडे बाराशे लहान मोठे कारखाने आहेत. या कारखान्यांतील दूषित रासायनिक सांडपाणी सातत्याने मुरबे दांडी नवापूर या समुद्र खाड्यांमध्ये सरसकट सोडलं जायचं. त्यामुळे या खाड्या पूर्णपणे प्रदूषित झाल्या होत्या. त्यामुळे येथील स्थानिक छोट्या मच्छीमारांवर मोठं संकट होतं. अनेक कुटुंबाचा उदरनिर्वाहाचा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे . बोईसर- तारापूर औद्योगिक क्षेत्रांतील साडे बाराशे कारखाने सध्या लॉक डाऊन मुळे बंद आहेत. याचा चांगला परिणाम आपल्याला या खाड्यांवरती दिसून येत आहे. या खाड्यांमधील पाणी अतिशय शुद्ध झालेले दिसून येत असून या खाड्यांमध्ये या काही दिवसातच मत्स्यबीज व मासे, खेकडे यायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील स्थानिक छोट्या मच्छीमारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
मागील वर्षांच्या अतिवृष्टीपासून मच्छीमार समाज नेहमी संकटात सापडलेला आहे. त्यामुळे या समाजावर नेहमीच उपासमारीची वेळ येते मात्र सध्या असलेला देशातील लॉक डाऊन येथील लहान मच्छीमार व्यावसायिकांसाठी वरदान ठरत आहे.
Coronavirus | लॉकडाऊनमुळे मुंबईतील प्रदुषणात विक्रमी घट
संबंधित बातम्या :
Corona | ज्येष्ठ नागरिकांनी 'या' गोष्टी पाळा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
Lock Down | लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह इफेक्ट; मुंबई, इटली, चीनमधील प्रदूषण घटलं!
Coronavirus | बाजारातील गर्दी कमी करण्यासाठी मुंबई पोलिसांची स्मार्ट आयडिया
कोरोनापेक्षा उपासमारीने जीव जायची वेळ, लोककलावंत मंगला बनसोडे यांची खंत
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्रीडा
भारत
सातारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)