एक्स्प्लोर
Advertisement
कोरोनापेक्षा उपासमारीने जीव जायची वेळ, लोककलावंत मंगला बनसोडे यांची खंत
कोरोनामुळे राज्यातील लोककलाकारांना देखील मोठा फटका बसला आहे. सर्व यात्रा रद्द झाल्याने तमाशा देखील रद्द झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे, रघुवीर खेडकर यांनी कलाकारांना सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी केली आहे.
मुंबई : राज्यात कर्फ्यू असल्यामुळे आता आमच्यावर कोरोना व्हायरसने कमी उपासमारीने जीव जायची वेळ आली आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रसिद्ध तमाशा कलावंत मंगला बनसोडे यांनी दिली आहे. ऐन उन्हाळ्यात कोरोनाचं संकट महाराष्ट्रावर आल्यामुळे आता तमाशा कलावंतांची उपासमार होण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात राज्यातील अनेक गावात यात्रा असतात. या काळात गावात येणाऱ्या पाहुण्यांचे मनोरंजन करण्यासाठी तमाशाचे आयोजन केलं जातं. परंतु यंदा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येक गावाने यात्रा रद्द केल्या आहेत. त्याचा परिणाम अनेक तमाशांचे फड आपल्या मूळ गावी किंवा चौफुला गावात अडकून पडलेत. आता त्यांच्याकडे जवळ असणारी पुंजी संपायला आल्यामुळे आता या कलाकारांवर उपासमार होण्याची वेळ आली आहे. याकडे सरकारने लक्ष द्यावं आणि कलावंतांना काहीतरी मदत करावी अशी मागणी मंगला बनसोडे यांनी केली आहे.
माझा कट्टा: सुप्रसिद्ध लोककलावंत मंगला बनसोडे यांच्याशी गप्पा
याबाबत बोलताना तमाशा फड मालक संघटनेचे अध्यक्ष रघुवीर खेडकर म्हणाले की, राज्यातील जेवढे तमाशांचे फड मालक आहेत. त्यांच्याकडे 100 ते 125 लोक काम करत असतात. सध्याच्या परिस्थितीत काम बंद झाल्यामुळे आता त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. सध्याची परिस्थिती आणखी किती दिवस राहिल याबाबत अद्याप तरी काही सांगता येतं नाही. आम्हांला राज्यातील अनेक गावातून तमाशाच्या तारखा मिळाल्या होत्या. त्याच्या आशेवर आम्ही काही रक्कम कलाकारांना दिली होती. परंतु आता तमाशेच रद्द झाल्यामुळे राहिलेले पैसे मिळणार नाहीत. त्यामुळे कलाकारांना काहीच पैसे देता येणार नाहीत. जर अशीच परिस्थिती राहिली तर कलावंताचं जगणं मुश्किल होईल. सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि निदान या कलाकारांपर्यंत किराणा माल तरी पोहचावा याची व्यवस्था करावी. मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले म्हणाले की सध्या आमचे प्रयत्न ज्युनिअर आर्टिस्ट आणि तमाशा कलावंतांना जगवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यासाठी आम्ही शक्य तितक्या कलाकारांना किराणा देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु आम्हांला देखील मर्यादा आहेत. आम्हांला सरकारने मदत केल्यास आम्ही मोठ्या प्रमाणात कलाकारांना मदत करू शकू.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
निवडणूक
निवडणूक
महाराष्ट्र
Advertisement