एक्स्प्लोर
Advertisement
'सैनिकांनो बंदुका मोडा, काश्मिरींना मिठ्या मारा' : सामना
'सैनिकांनो बंदुका मोडा, काश्मिरींना मिठ्या मारा'' असा उपहासात्मक टोमणा ‘सामना’तून पंतप्रधान मोदींना मारण्यात आला.
मुंबई: 'सैनिकांनो बंदुका मोडा, काश्मिरींना मिठ्या मारा'' असा उपहासात्मक टोमणा ‘सामना’तून पंतप्रधान मोदींना मारण्यात आला.
तसंच आतापर्यंत असा विचार कसा कुणालाच सुचला नाही, याचं आश्चर्य वाटतं. पण हा विचार अंमलात आणण्यासाठी, काश्मिरातलं कलम 370 हटवा म्हणजे सर्व जनता काश्मिरात जाऊन तिथल्या लोकांची गळा भेट घेईल, असाही टोला लगावण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल स्वातंत्र्य दिनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरुन देशाला संबोधित केलं.
यावेळी त्यांनी ‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’ असं म्हणत तणावग्रस्त जम्मू काश्मीरवर भाष्य केलं. त्यावरुन शिवसेनेने मोदींवर उपहासात्मक टीका केली.
‘सामना’त काय म्हटलंय?
कश्मीरचा हिंसाचार व अतिरेक मोडून काढण्यासाठी पंतप्रधानांनी जो गांधी विचार लाल किल्ल्यावरून मांडला, त्यामुळे आम्हीच काय, देशही निःशब्द झाला असेल. ‘‘ना गोली से, ना गाली से… समस्या काहल होगा कश्मिरी लोगों को गले लगाने से!’’ खरंच हा महान विचार आतापर्यंत कुणाला कसा सुचलानाही याचेच आश्चर्य वाटते. आता हा विचार अमलात आणण्यासाठी एकच करा. कश्मीरातील 370 कलम लगेच हटवून टाका. म्हणजे देशभरातील लोकांच्या झुंडीच्या झुंडी कश्मीरात जातील व तेथील लोकांच्यागळाभेटी घेतील. सैनिकांनो, बंदुका मोडा व कश्मिरींना मिठ्या मारा. पंतप्रधानांच्या जोरदार भाषणाचेआम्ही स्वागत करीत आहोत!
संबंधित बातम्या
‘ना गाली से, ना गोली से, कश्मीर की समस्या सुलझेगी गले लगाने से’
नोटाबंदीनंतर 3 लाख कंपन्यांचं हवाला रॅकेट उद्ध्वस्त : पंतप्रधान मोदी
न्यू इंडियासाठी 'टीम इंडिया'ने एकत्र येण्याची गरज : पंतप्रधान मोदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement