एक्स्प्लोर
लोकलची जुनी ‘ऊर्जा’ इतिहासजमा होणार, ऐतिहासिक प्रवासासाठी 10 हजाराचं तिकीट

मुंबई : तब्बल 91 वर्षांच्या सेवेनंतर डीसी विद्युतप्रवाहावर धावणारी लोकल इतिहासजमा होणार आहे. डीसीवर चालणारी शेवटची विशेष लोकल आज रात्री 11.30 वाजता कुर्ला ते सीएसटी स्थानकांदरम्यान धावणार आहे. विशेष म्हणजे या ऐतिहासिक प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी प्रवाशांना 10 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यासाठी तीन डबे प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. तिकिटांची विक्री सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टसद्वारे करण्यात येणार आहे. https://twitter.com/Central_Railway/status/718335953509695488 यातून जमा होणारा निधी राज्यातील दुष्काळग्रस्तांना देण्यात येणार आहे. शेवटच्या डीसी लोकलनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सीएसटी येथील खास दालनात डीसी ते एसी विद्युत परिवर्तनाच्या कामांचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात येईल.पहिली डीसी लोकल 3 फेब्रुवारी 1925 रोजी मुंबई ते कुर्ला स्थानकादरम्यान धावली होती.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
व्यापार-उद्योग
राजकारण























