एक्स्प्लोर
मारायचंच असेल तर मनसेने सीमेवर पाक सैनिकांना मारावं : आठवले
मनसेच्या कार्यकर्त्यांची गुंडागर्दी अशीच सुरु राहिली, तर भीमसैनिक 'ईट का जवाब पत्थर से देंगे' असा इशाराही रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे.
![मारायचंच असेल तर मनसेने सीमेवर पाक सैनिकांना मारावं : आठवले Ramdas Athavale Challenges Mns To Kill Pakistani Jawans On Border Latest Update मारायचंच असेल तर मनसेने सीमेवर पाक सैनिकांना मारावं : आठवले](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/10/22105758/Ramdas-Athavale.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मनसे कार्यकर्त्यांना कोणाला मारायचंच असेल, तर त्यांनी सीमेवर जाऊन पाकिस्तानी सैनिकांना मारावं, असा खोचक सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिला आहे. मुंबई-ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्यांविरोधात मनसेने केलेल्या आंदोलनानंतर आठवलेंनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांची गुंडागर्दी अशीच सुरु राहिली, तर भीमसैनिक 'ईट का जवाब पत्थर से देंगे' असा इशाराही रामदास आठवले यांनी मनसेला दिला आहे. गरीब बिचाऱ्या फेरीवाल्यांच्या रक्षणासाठी वेळ पडल्यास भीमसैनिक रस्त्यावर उतरतील, असंही रामदास आठवले म्हणाले.
मनसे कार्यकर्त्यांना कोणाला मारायचंच असेल, तर त्यांनी सीमेवर जाऊन पाकिस्तानी सैनिकांना मारावं, अशा शब्दात आठवलेंनी मनसेचा समाचार घेतला.
राज ठाकरेंकडून परप्रांतियांनाच लक्ष्य, संजय निरुपम यांचा आरोप
राज ठाकरे यांनी मुंबई-ठाण्यातील रेल्वे स्थानकांबाहेरील फेरीवाल्यांविरोधात खळ्ळ खट्यॅक केल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांचाही तीळपापड झाला आहे. मनसे कार्यकर्त्यांनी फक्त परप्रांतीय फेरीवाल्यांविरोधातच आंदोलन केल्याचा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्याक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे
राज ठाकरे यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांशी लागेबांधे असल्याचा घणाघातही निरुपम यांनी केला आहे. 15 दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी खुलेआमपणे धमकी दिली. कायदा, मुख्यमंत्री यांना खुलं आवाहन दिलं. मात्र मुख्यमंत्री बांगड्या भरुन बसले आहेत. त्यांनी 15 दिवसांत कोणतीही कारवाई केली नाही, असं निरुपम म्हणाले.ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड
एलफिन्स्टन स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर राज ठाकरे यांनी रेल्वे स्थानक परिसरातले फेरीवाले हटवण्यासाठी 15 दिवसांचा अल्टिमेटम रेल्वे प्रशासनाला दिला होता. काल 15 दिवसांची डेडलाईन संपल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावायला सुरुवात केली. मनसेनं ठाणे, कल्याण, वसई, घाटकोपर रेल्वे स्थानकावर फेरीवाल्यांना हुसकावून लावले. फेरीवाल्यांचं सामान रस्त्यावर फेकून पुन्हा ठेले न लावण्याची तंबी दिली.PHOTO : ठाणे स्टेशनबाहेर फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची मनसेकडून तोडफोड
कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांवरील खळ्ळ खट्यॅक प्रकरणी मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कल्याणच्या एमएफसी आणि डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही शहरातील मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह 25 ते 30 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
परभणी
राजकारण
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)