एक्स्प्लोर

संदीप येवलेंनी पुरावे द्यावेत नाहीतर 100 कोटींचा दावा ठोकेन: राम कदम

मुंबईतल्या एसआरएस घोटाळा स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस येऊन 24 तास उलटल्यानंतरही या प्रकरणी कारवाईचे कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत. पण या प्रकरणी विरोधकांनी मात्र कारवाईसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई: मुंबईतल्या एसआरएस घोटाळा स्टिंग ऑपरेशनद्वारे उघडकीस येऊन 24 तास उलटल्यानंतरही या प्रकरणी कारवाईचे कोणतीही पावलं उचलली गेलेली नाहीत. पण या प्रकरणी विरोधकांनी मात्र कारवाईसाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली आहे. स्टिंग ऑपरेशननंतर सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले हे काल (बुधवार) 40 लाखांची रोकड घेऊन थेट मीडियासमोर आले होते. यावेळी त्यांनी अनेक बड्या नेत्यांवरही आरोप केले होते. यावेळी संदीप येवलेंनी भाजप आमदार राम कदम यांच्यावरही टीका केली होती. त्यांच्या याच आरोपाला आज (गुरुवार) राम कदम यांनी उत्तर दिलं आहे. ‘घाटकोपरच्या घरा-घरातील लोकांना माहिती आहे की, राम कदम काय आहे’
संदीप येवले यांच्या आरोपानंतर भाजप आमदार राम कदम यांनीही या आरोपाला उत्तर दिलं आहे. ‘संदीप येवले या व्यक्तीने राजकीय हेतून प्रेरित होऊन माझ्यावर आरोप केले आहेत. जर त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी ते द्यावेत. त्या भागातील 33 लोकांची घरं मी वाचवली, त्यामुळे या माणसाच्या मागे असणारी लोकं माझ्या मागे आली याचाच त्याच्या मनात राग आहहे. महत्त्वाचा मुद्दा असा की, जसा लाच देणारा गुन्हेगार आहे. तसाच लाच घेणाराही गुन्हेगार आहे. त्यामुळे जर 24 तासाच्या आता त्यांनी पुरावे दिले नाहीतर नाईलाजानं मला 100 कोटीचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकावा लागेल. घाटकोपरच्या घरा-घरातील लोकांना माहिती आहे की, राम कदम काय आहे.’ असं यावेळी राम कदम म्हणाले.
  VIDEO: विक्रोळी पार्कसाईटमधील एसआरए पुनर्विकासातला घोटाळा लपवण्यासाठी एका बिल्डरनं तब्बल 11 कोटी लाच देण्याची तयारी दाखवल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते संदीप येवले यांनी केला आहे. या 11 कोटींपैकी 40 लाख देतानाचं स्टिंग ऑपरेशन येवलेंनी सादर केलं आहे. विक्रोळीतल्या पार्कसाईट भागातल्या हनुमाननगर योजनेत सुरु असलेला भ्रष्टाचार आणि त्यात बिल्डरनं सगळ्यांना कसं मॅनेज केलं याचे पुरावेही येवले यांनी समोर ठेवले आहेत. दरम्यान, या सगळ्या घोटाळ्यात एसआरएचे अलीकडेच निवृत्त झालेले कार्यकारी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरही येवलेंनी गंभीर आरोप केले आहेत. बिल्डरनं दिलेले सगळे पैसे घेऊन येवले मुंबई मराठी पत्रकार संघात दाखल झाले आणि संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे. संदीप येवलेंनी नेमके काय आरोप केले? ‘विक्रोळीतील हनुमाननगरच्या विभागात 22 वर्षापासून एसआरए योजना बंद पडली आहे. असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. या योजनेत आतापर्यंत कायद्याचं उल्लंघन झालं आहे. या योजनेतील भष्ट्राचार आम्ही माहिती अधिकारच्या अंतर्गत उघड केल्यानंतर बिल्डरनं मला 11 कोटीची लाच देण्याचा प्रयत्न केला. त्यापैकी 1 कोटीची रोख रक्कम दिली. त्यापैकी 40 लाख मी मीडियासमोर आणले आहेत.’ असा गंभीर आरोप संदीप येवलेंनी केला आहे. ‘या प्रकरणी माझ्याशी बोलणी करण्याकरिता बिल्डरच्या वतीनं कौशिक मोरे ही व्यक्ती आली होती. ‘माझं सेटिंगचंच काम आहे. बाबूलाल वर्मा हे तर सीएम आणि पीएमलाही खिशात ठेवतात.’ असं कौशिक मोरेनं मला सांगितलं होतं.’ असंही येवले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. ‘बिल्डर मोठा आहे पैसे घेऊन जा. असं मला एसआरएच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.’ असा आरोप त्यांनी एसआरए अधिकाऱ्यांवरही केला. ‘दरम्यान, माझ्यासोबत ज्या मीटिंग झाल्या त्याचे कॉल रेकॉर्डिंगही माझ्याकडे आहेत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे.’ अशी मागणी येवलेनं केली आहे. ‘याप्रकरणी माझ्यावर राजकीय दबावही’ ‘माननीय आमदार राम कदम यांना मी दीड वर्षापूर्वी याबाबत निवेदन दिलं होतं. तेव्हा राम कदम मला म्हणाले की, ‘हे लोकं काही तुझ्याकडे बघणार नाही, मी तुला बिझनेस काढून देतो.’  त्यानंतर मी किरीट सोमय्या, आणि प्रकाश मेहतांकडे गेलो. पण बिल्डर लॉबीसमोर यांचं काहीच चालत नाही. किरीट सोमय्यांनी तर आम्हाला अक्षरश: हाकलून लावलं. यावेळी येवलेंनी आमदार राम कदमांना आव्हानही दिलं. ‘राम कदम यांना आम्ही चॅलेंज देतो, की पुढच्या वेळी आम्ही तुम्हाला मंदिरात बसवू आणि आम्ही दुसरा आमदार निवडून आणू.’ संंबंधित बातम्या: बिल्डरकडून कोट्यवधीची लाच, रोख रकमेसह सामाजिक कार्यकता मीडियासमोर

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त
Mahapalika Election : पुण्यात पेरलं, नागपुरात उगवलं; नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटल्याची रंजक कथा Special Report
Chhatrapati Sambhajinagar BJP Sena Alliance : कालपर्यंत युती, अखेरीस माती Special Report
Gharaneshahi Politics : घराणेशाही जोमात उमेदवार घरात, नेत्यांच्या घरात उमेदवारी, कार्यकर्त्यांची नाराजी Special Report
Mahayuti Politics : 'अपूर्ण' युतीची पूर्ण कहाणी, कुठे भाजप-शिवसेना एकत्र? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Dhananjay Munde : करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
करुणा शर्मांचा पत्नी म्हणून उल्लेख टाळल्याचं प्रकरण; धनंजय मुंडेंविरोधातील याचिका फेटाळली
Embed widget