एक्स्प्लोर
Advertisement
Raj Thackeray | मराठी मुस्लिमांमुळे दंगली होत नाहीत, ते इथल्याच मातीतले : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी सीएएला विरोध तर एनआरसीचं समर्थन केल्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा निघाला. या मोर्चात राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला.
मुंबई : राज्यात जिथे मराठी मुस्लीम राहत तिथे कधी दंगली झालेल्या नाहीत. ते मुस्लीम इथल्याच मातीतले आहेत. पण आज असे अनेक मोहल्ले उभे राहिले आहेत जिथे पाकिस्तान, बांगलादेशमधील मुस्लीम राहत आहेत. मीरा भाईंदरमध्ये तर नायजेरियन लोक येत आहेत. पोलीस तिथे जाऊ शकत नाहीत. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नाही. ते ड्रग्ज विकतात, महिलांची छेड काढतात आणि आपण फक्त षंडासारखं पाहत राहायचं असा संताप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. आज मनसेच्या मोर्चानंतर आझाद मैदानावर राज ठाकरे यांनी बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांवर हल्लाबोल केला. सोबतच सीएए समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांवर देखील टीका केली.
यावेळी ते म्हणाले की, मुस्लिमांनी जे मोर्च काढले त्याचा अर्थच कधी लागला नाही. सीएए किंवा एनआरसी असेल जे जन्मापासून येथे राहत आहेत त्यांना कोण बाहेर काढत होतं. तसं कायद्यातच नाही तर मग तुम्ही कोणाला ताकद दाखवलीत असा सवाल राज ठाकरे यांनी मोर्चा काढणाऱ्यांना यावेळी विचारला. पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकललंच पाहिजे. त्यात तडजोड होऊच शकत नाही. अनेकांना सीएएबद्दल काहीच माहिती नाही. फक्त व्हॉट्सअॅपवर चर्चा करतात आणि मेसेज पुढे पाठवतात, असंही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले हा 1955 सालचा कायदा आहे. ज्यावेळी देशाची फाळणी झाली त्यानंतर 1955 साली हा कायदा झाला. तेव्हा परिस्थिती वेगळी होती. आज 2000 मधील परिस्थिती वेगळी आहे. पाकिस्तान भारतापासून विभक्त झाला होता, चाचपडत होता. पण आज काय परिस्थिती आहे त्या देशांची आणि खासकरुन पाकिस्तानची हे पाहावं, असं राज ठाकरे म्हणाले.
Raj Thackeray | ... अन्यथा दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल : राज ठाकरे
राज ठाकरे म्हणाले की, पाकिस्तान दहशतवाद्यांचा अड्डा झाला आहे. अमेरिकेत दहशतवादी हल्ला करणारा ओसामा बिन लादेन पाकिस्तानात होता. आपल्या देशात अनेक बॉम्बस्फोट झाले ज्यात अनेक लोक मारले गेले या सगळ्यामागे पाकिस्तान होतं. दाऊद इब्राहिमलाही पाकिस्तानने सांभाळलं असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केला. राज ठाकरे म्हणाले की, माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटला का? कोणीही येतं, कसंही राहतं. आपल्या देशात अनेक प्रश्न आहेत याची मला कल्पना आहे. पण बाहेरुन येणाऱ्या घुसखोरांचाही तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. भारताने काही माणुसकीचा ठेका घेतलेला नाही. बाहेरच्या देशांमध्ये इतके कडक नियम आहे. पासपोर्ट नसल्यास पोलीस दोन पर्याय देतात. एक तर तुझ्या देशात परत जा किंवा जेलमध्ये जा. बाकीचे देश सुतासारखे सरळ होत आहेत. पण मग आम्हीच फक्त माणुसकीचा ठेका घेऊन बसलो आहोत का? अशी विचारणा राज ठाकरेंनी केली.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement