एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray | ... अन्यथा दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल : राज ठाकरे
राज ठाकरे यांनी सीएएला विरोध तर एनआरसीचं समर्थन केल्याची भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानी आणि बांग्लादेशी घुसखोऱ्यांविरोधात आज मनसेचा मुंबईत मोर्चा निघाला. या मोर्चात राज ठाकरे काय म्हणाले....
मुंबई : आज मोर्चाला मोर्चाने उत्तर दिलं आहे. इथून पुढे दगडाला दगडाने अन् तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल, अशा इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला आहे. बाहेरच्यांना हाकललंच पाहिजे त्यात कुठेही तडजोड केली नाही पाहिजे. कुणीही येतात कुठेही राहतात. भारताने माणुसकीचा ठेका नाही घेतलेला नाही. माझा देश म्हणजे काय धर्मशाळा वाटली काय, अशा शब्दात राज ठाकरे यांनी हल्लाबोल केला. आज दिवसभर मनसेच्या मोर्चाने लक्ष वेधले असताना राज ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आझाद मैदानावर राज ठाकरे यांनी बांग्लादेशी, पाकिस्तानी घुसखोरांवर हल्लाबोल केला. सोबतच सीएए समर्थनार्थ मोर्चे काढणाऱ्यांवर देखील टीका केली.
आपल्या भाषणात राज ठाकरे म्हणाले की, ज्यावेळी केंद्राची चूक झाली तेव्हा मी टीका केली. चांगला काम केलं तेव्हा अभिनंदन केलं. मी टीका केली त्यावेळी भाजप विरोधक आणि अभिनंदन केलं तर समर्थक अशा टीका केल्या गेल्या. मधलं काही आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, अनेक मराठी मुसलमान तिथे दंगली होत नाही जिथे बाहेरून येत आहेत, तिथे गैरप्रकार होतात. फक्त बांग्लादेशी मुसलमान नाही तर नायजेरियन घुसखोरांनी वसई-विरार-मिरा-भाईंदर इथे उन्माद घातला आहे. ते ड्रग्स विकतात, माता भगिनींची छेड काढतात. या लोकांचा बंदोबस्त करायला हवा, असं ते म्हणाले.
पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात आज मनसेने महामोर्चा आयोजित केला होता. गिरगाव ते आझाद मैदान हा मोर्चा निघाला. केवळ मुंबईतूनच नाही तर ठाणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूर, पुण्यातूनही मनसेचे कार्यकर्तेही मुंबईत मोर्चासाठी आले होते.
MNS March Live | मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आझाद मैदान येथील भाषणाचे थेट प्रक्षेपण
या मोर्चात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सहकुटुंब सहभागी झाले. अमित ठाकरे मनसेच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच मोर्चात सहभागी झाले. पुणे, नाशिक, औरंगाबाद, सोलापूरमधून मनसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. आझाद मैदानावरही कडेकोट सुरक्षाव्यवस्था करण्यात आली आहे.
मनसेच्या मोर्चाच्या निमित्ताने 'अमर ज्योत स्मारकाला' पोलिसांची कडेकोट सुरक्षा -
याच अमर ज्योतचे चित्र दाखवून मनसेने एका व्यापक राजकीय प्रवासाला सुरुवात केलीय. काही वर्षांपूर्वी 'अमर जवान ज्योतीची' रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी नासधूस आली होती. त्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रस्त्यावर उतरून आझाद मैदानापर्यंत मोर्चा काढला होता. आज पुन्हा राज ठाकरे अशाच पद्धतीने बांगलादेशी-पाकिस्तानी घूसखोरांविरोधात मोर्चा काढत आहेत ज्यात या 'अमर जोती स्मारकाला' विशेष महत्व आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
राजकारण
क्रीडा
क्राईम
Advertisement