एक्स्प्लोर
लोकलमध्ये सुरेश प्रभूंना सीटची ऑफर, प्रभूंचा रिप्लाय...

मुंबई: केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभूंनी भारतीय रेल्वेवर 'हायटेक कृपा' करण्याचा इरादा केला आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलण्यासाठी सुरेश प्रभूंनी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. प्रभूंनी त्यातल्या प्रमुख प्रकल्पांची आणि त्या प्रकल्पाच्या प्रगतीची मुंबईतील कार्यक्रमात सविस्तर माहिती दिली. मांटुगा रेल्वे कारखान्याच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरेश प्रभू मुंबईत आले होते. यावेळी प्रभूंच्या हस्ते करीरोडच्या फूट ओव्हर ब्रिजचंही उद्घाटन कऱण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सुरेश प्रभूंमध्ये अनेक प्रकल्पावर सविस्तर चर्चा झाली. दरम्यान सुरेश प्रभूंनी आज दुसऱ्या दिवशीही मुंबई लोकलमधून प्रवास केला. खुद्द रेल्वे मंत्री लोकलमध्ये आले म्हटल्यावर प्रवाशांनी त्यांना बसण्यासाठी जागा देऊ केली. मात्र सुरेश प्रभूंनी मोठ्या प्रांजळपणे प्रवाशांना नकार दिला आणि उभ्यानं प्रवास केला. प्रभूंनी कालही करी रोड ते सीएसटी असा उभं राहून लोकलमधून प्रवास केला होता. तर आज त्यांनी पश्चिम रेल्वेवर खाररोड ते विलेपार्ले असा प्रवास लोकलमधून केला. यावेळीही त्यांनी उभं राहूनच प्रवास केला.
संबंधित बातम्या
सुरेश प्रभूंचा लोकलमध्ये प्रवाशांशी संवाद
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
बातम्या
करमणूक
महाराष्ट्र























