एक्स्प्लोर
पगार 40 हजार, नळ चोरला 180 रुपयांचा, रेल्वेगार्डचा प्रताप
मनोज भडांगे या रेल्वेगार्डने वॉशरूममधील हॅण्डशॉवर चोरल्याचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे.
मुंबई: कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार बहुचर्चित तेजस एक्स्प्रेसमध्ये पाहायला मिळाला. यापूर्वी प्रवाशांनी हेडफोन्स किंवा अन्य साहित्या ढापून नेल्याचं समोर आलं होतं. मात्र आता खुद्द रेल्वेगार्डनेच तेजस एक्स्प्रेसमध्ये चोरी केली.
मनोज भडांगे या रेल्वेगार्डने वॉशरूममधील हॅण्डशॉवर चोरल्याचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. ही घटना 2 ऑगस्ट रोजी घडली आहे.
आश्चर्य म्हणजे 180 रुपयांचा नळ अर्थात हॅण्डशॉवर चोरणाऱ्या मनोज भडांगेचा मासिक पगार 40 हजारांच्या वर आहे.
दरम्यान भडांगेविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भडांगे 2 ऑगस्टला माझगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसदरम्यान तेजस एक्स्प्रेसमध्ये देखभालीच्या ड्युटीवर होता. त्याच रात्री त्याने हात धुण्याच्या नळावर ‘हात साफ’ केला.
मात्र वॉशरुममध्ये नळ नसल्याचं मालगाडीच्या एका इंजिनिअरच्या लक्षात आलं. त्याने याबाबतची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
यानंतर रेल्वे पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता, मनोज भडांगेने नळ चोरल्याचं उघड झालं.
संबंधित बातम्या
तेजस एक्स्प्रेसच्या पहिल्याच फेरीत प्रवाशांचा हेडफोन्सवर डल्ला
मुंबई : कशी आहे मुंबई-गोवा मार्गावरील हायटेक-आलिशान तेजस एक्स्प्रेस ?
परतीच्या प्रवासात तेजस एक्स्प्रेसमध्ये घाणीचं साम्राज्य
अवघ्या आठ तासात तेजस करमाळीत दाखल
हायटेक तेजसच्या प्रवासासाठी 780 ते 2740 रुपये तिकीट
केवळ साडे 8 तासात मुंबई-गोवा… हायटेक ‘तेजस’ सज्ज!
‘तेजस’वर समाजकंटकांची वक्रदृष्टी, काचा फोडल्या
मुंबई-गोवा 8.30 तासात, तेजस एक्स्प्रेस 22 मेपासून ट्रॅकवर!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement