एक्स्प्लोर

PRESIDENTIAL ELECTION 2022 : 'मुर्मूंना राज्यातील 200 आमदार मतदान करणार' मुख्यमंत्र्यांचा दावा? बाकीचे 20 आमदार आणणार कुठून?

PRESIDENTIAL ELECTION 2022 : राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करतील असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

PRESIDENTIAL ELECTION 2022 : राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांना राज्यातील दोनशे आमदार मतदान करतील असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सध्या भाजप आणि शिंदे गटाचे मिळून एकूण 165 आमदार आहेत. तर शिवसेनेनं मुर्मू यांना पाठिंबा दिल्यामुळे त्याचे 15 मिळून ही संख्या 180 पर्यंत पोहोचली आहे. म्हणजेच एकनाथ शिंदे यांना 200 चा पल्ला गाठण्यासाठी आणखी 20 आमदारांची गरज लागणार आहे. यासाठी शिंदेंची नजर विरोधी बाकावर आहे असं बोललं जात आहे.  राष्ट्रपती निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदार फोडणार का याकडं लक्ष लागलंय.. काँग्रेसचे विधानसभेत 44 तर राष्ट्रवादीचे 53 सदस्य आहेत. त्यामुळे ते 20 आमदार कोणत्या पक्षाचे असतील याबाबत चर्चा सुरु झाल्या आहे.

शिंदे यांनी जर असा दावा केला असेल तर वरील 20 मतं ते कुठून आणणार याबाबत आता चर्चा सुरु आहे. राष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांच्या एकीला एकापाठोपाठ एक सुरुंग लागत चालले आहेत.  गेल्या आठवडाभरात तब्बल तीन पक्षांनी यूपीए मित्र पक्षांची साथ देत एनडीएच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. आधी शिवसेना नंतर झारखंड मुक्ती मोर्चा आणि आज ओम प्रकाश राजभर हे तीन पक्ष एनडीएच्या साथीला आले आहेत. 

राष्ट्रपती पदाची निवडणूक जाहीर होण्याआधी 2017 पेक्षा यावेळची निवडणूक भाजपसाठी जड असेल असं मानलं जात होतं. जवळपास 26 हजार मतं कमी पडत होती. पण राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून द्रौपदी मुर्मु यांचं नाव एनडीएनं जाहीर केलं आणि पारडं फिरलं. कारण आदिवासी आणि त्यातही महिला उमेदवाराला विरोध करणं अनेक पक्षांसासाठी अडचणीचं ठरलं. 

खरंतर विजयासाठी कमी असलेल्या मतांची भाजपनं लगेचच गोळाबेरीज केली होती. वायएसआरचे जगनमोहन रेड्डी, बिजू जनता दलाचे नवीन पटनाईक या दोघांच्याच पाठिब्यानं भाजपची चिंता दूर केली होती. पण सोबत इतर पक्षही जुळत चालल्यानं विरोधकांच्या एकीला सुरुंग लावण्यातही भाजप यशस्वी ठरत आहे. विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्यासाठी मुंबईत होणारी महाविकास आघाडीची बैठक तर रद्द करावी लागली. 

त्यामुळे आता राष्ट्रपती निवडणुकीत केवळ एनडीएच्या विजयाची औपचारिकताच बाकी आहे असं म्हणायला हरकत नाही. ही निवडणूक म्हणजे 2024 च्या दृष्टीनं विरोधकांच्या एकीची परीक्षा असणार होती. पण त्यात तूर्तास तरी विरोधक पूर्णपणे अयशस्वी झाल्याचं चित्र दिसतंय.

इतर महत्वाच्या बातम्या

Presidential Election 2022 : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांच्या एकीला आठवडाभरात तिसरा धक्का!

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू नव्हे तर रामनाथ कोविंद यांनीही टाळली होती 'मातोश्री' भेट

Presidential Elections 2022 : देशाला पहिला आदिवासी राष्ट्रपती मिळण्याची शक्यता; एनडीएच्या द्रौपदी मुर्मू यांचं पारडं जड 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
अमित शाहंनी देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याचे संकेत दिले; उद्धव ठाकरे कडाडले, शिंदे-पवारांवर घणाघाती टीका
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
Embed widget