बीएमसीने पाठवलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाची प्राथमिक मंजुरी, 227 ऐवजी 236 वॉर्ड असणार
बीएमसीने पाठवलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक मंजुरी दिली आहे. प्रारूप आराखड्यासंदर्भात हरकती व सूचना मागण्याबाबत निवडणूक आयोगाचे बीएमसी आयुक्तांना पत्र देखील आले आहे.
BMC Election 2022 : मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका 2022 साठी बीएमसीने पाठवलेला वॉर्ड पुनर्रचना आराखड्याला राज्य निवडणूक आयोगाने प्राथमिक मंजुरी दिली आहे. प्रारूप आराखड्यासंदर्भात हरकती व सूचना मागण्याबाबत निवडणूक आयोगाचे बीएमसी आयुक्तांना पत्र देखील आले आहे. मुंबई महापालिकेचा प्रारूप आराखडा ओबीसी आरक्षण वगळून सूचना हरकतीसाठी पाठवण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये 227 ऐवजी आता 236 वॉर्ड असणार आहेत. आता या संदर्भातील प्रारुप आराखडा कसा असेल, आरक्षण कशा पद्धतीने असेल याबाबतची माहिती राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून दिली आहे.
हा प्रारूप आराखडा दिल्यानंतर यावर हरकती सूचना मागवल्या जाणार आहेत. प्रारुप प्रभाग रचनेस मान्यता व निवडणूक प्रभागाच्या सीमा जाहीर करून हरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रमासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. मात्र, यामध्ये ओबीसी आरक्षण संदर्भात कुठलाही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी जागा या खुल्या प्रवर्गातील समाविष्ट केले जाण्याची शक्यता आहे.
या प्रारूप आराखड्यानुसार मुंबईत महापालिकेत एकूण 236 वॉर्ड असतील
आरक्षण
खुला प्रवर्ग - 219
एससी -15
एसटी - 2
महिला जागा
एकूण
खुला प्रवर्ग - 118
एससी - 8
एसटी - 1
हरकती व सूचना मागविणे व त्यानुसार सुनावणी देण्याचा कार्यक्रम नेमका कसा असणार ?
1 फेब्रुवारी
निवडणूक प्रभागाच्या सीमा दर्शवणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्र पत्रात प्रसिद्ध करणे व त्यास प्रसिद्धी देणे
1 ते 14 फेब्रुवारी
यादरम्यान प्रारूप आधी सूचनेवर हरकती व सूचना मागविण्याचा कालावधी
16 फेब्रुवारी
प्राप्त झालेला हरकती व सूचनांचे विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास सादर करणे
26 फेब्रुवारी
राज्य निवडणूक आयोगाचे प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत हरकती व सूचनासंदर्भात सुनावणी देण्याचा अंतिम दिनांक
2 मार्च
सुनावणीनंतर प्राधिकृत अधिकारी यांनी केलेल्या शिफारसी विहित नमुन्यात नमूद करून विवरणपत्र राज्य निवडणूक आयोगास पाठवण्याची दिनांक असेल
2011 च्या लोकसंख्येच्या आधारापेक्षा गेल्या 11 वर्षांच्या काळात वाढलेल्या नव्या इमारती, वस्त्या, आणि वाढीव नवी बांधकामे झालेल्या ठिकाणच्या लोकसंख्येच्या घनतेचा आधार घेऊन वॉर्ड पुर्नरचना केली आहे. मुंबई शहर, पश्चिम उपनगरे आणि पूर्व उपनगर याठिकाणी समसमान 3 वॉर्ड वाढवल्याची सूत्रांची माहिती आहे. शहरभागात लोअर परळ, वरळीसारख्या ठिकाणी नवी बांधकामे आणि इमारती उभ्या राहिलेल्या परिसरात नवे वॉर्ड येण्याची शक्यता असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. पूर्व उपनगरांमध्ये मानखुर्द, संघर्षनगर, माहूल याठिकाणी नवे वॉर्ड येण्याची शक्यता आहे. पश्चिम उपनगरात बोरिवली, मालाड, वांद्रे भागात वॉर्ड वाढवले जाण्याची शक्यता आहे. तसेच मुंबई महापालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षणाचे काय होणार? असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीतही सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार ओबीसींच्या आरक्षीत जागा ओपन म्हणून ग्राह्य धरल्या जाऊ शकतील, अशी शक्यताही सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या: