एक्स्प्लोर

युतीचं घोडं कशाला भिजवत ठेवता, प्रशांत किशोरांचा शिवसैनिकांना सवाल

लग्नातील नवरदेव तुम्ही, वराती तुम्ही, मग काही जागांसाठी कशाला लग्न थांबवता, अशा सूचक विधानातून किशोर यांनी भाजपशी युती करण्याचा सल्ला शिवसेनेला दिलाय. तसेच त्यांनी 24-24 फॉर्म्युल्याने युती झाली तर काय हरकत आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले.

मुंबई : शिवसेना-भाजपची युती जदयूचे चाणाक्य प्रशांत किशोर घडवून आणण्याची शक्यता दिसून येत आहे. “काही जागांसाठी युतीचं घोंगडं कशाला भिजवत ठेवता”, असा थेट सवालच प्रशांत किशोर यांनी शिवसेनेला विचारला आहे.  यावरुनच प्रशांत किशोर यांचं मातोश्रीवर येणं हे युती होणार असल्याच्या शक्यतेला बळ देणारं आहे. लग्नातील नवरदेव तुम्ही, वराती तुम्ही, मग काही जागांसाठी कशाला लग्न थांबवता, अशा सूचक विधानातून किशोर यांनी भाजपशी युती करण्याचा सल्ला शिवसेनेला दिलाय. तसेच त्यांनी 24-24 फॉर्म्युल्याने युती झाली तर काय हरकत आहे, असेही प्रशांत किशोर म्हणाले. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे पक्षाचा चेहरा असल्याचीही उल्लेख त्यांनी केला. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेने ट्रम्प कार्ड खेळलं आहे. यशस्वी निवडणूक प्रचार रणनीतीकार अशी ख्याती असलेल्या प्रशांत किशोर यांना 'मातोश्री'वर निमंत्रित करण्यात आलं होतं. 2019 मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या प्रचाराचं शिवधनुष्य प्रशांत किशोर उचलणार आहेत. आज शिवसेनेच्या खासदार आणि मंत्र्यांची मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थित बैठक झाली.  या बैठकीत प्रशांत किशोर यांनी शिवसेना खासदार, आमदारांना हे मार्गदर्शन केल्याचं समजतंय. बैठकीत शिवसेनेच्या लोकसभा निवडणूक प्रचार रणनीतीवर महत्त्वाची चर्चा झाल्याची माहिती आहे. 'मातोश्री'वर शिवसेना खासदारांच्या बैठकीला हेमंत गोडसे, गजानन कीर्तिकर, शिवाजी आढळराव पाटील, चंद्रकांत खैरै, राहुल शेवाळे, अरविंद सावंत, अनंत गीते, संजय राऊत, श्रीकांत शिंदे यांच्यासोबत रामदास कदम, संजय राठोड, निलम गोऱ्हेही उपस्थित होते. प्रशांत किशोर यांची कारकीर्द निवडणुकीत आपल्या आगळ्यावेगळ्या आणि परिणामकारक प्रचार मोहिमेसाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रशांत किशोर यांनी देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांसाठी काम केलं आहे. प्रशांत किशोर यांनी 2014 च्या लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान नरेंद्र मोदींसाठी काम केलं. ‘चाय पे चर्चा’ सारखा हिट कार्यक्रम असो की ‘अब की बार...’ सारख्या घोषणा या प्रशांत किशोर यांनी आखलेल्या रणनीतीचाच भाग होत्या. 2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपसाठी निवडणूक रणनितीकार म्हणून काम केल्यानंतर प्रशांत किशोर हे नितीश कुमार यांच्या संपर्कात आले. बिहार विधानसभा निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांना साथ दिली. नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव एकत्र येण्यातही प्रशांत यांचा मोठा वाटा होता. 2015 साली बिहारमधील विधानसभा निवडणुकीत त्यांनी जेडीयूसाठी रणनिती आखली. 'बिहार में बाहर हो, नितीश कुमार हो' यासारख्या घोषणा प्रशांत किशोर यांचीच कल्पना आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेश विधानसभांच्या निवडणुकांसाठी प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी यांच्यासोबत काम केलं होतं. 16 सप्टेंबर 2018 रोजी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेड या पक्षात प्रवेश केला. संबंधित बातम्या : शिवसेनेची 'चाणक्य'नीती, प्रशांत किशोर यांच्याकडे प्रचाराची धुरा
प्रशांत किशोर जेडीयूच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Balasaheb Thackeray Smarak : बाळासाहेबांच्या स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवणार?Top 80 at 8AM Superfast 14 January 2025 सकाळी ८ च्या ८० महत्वाच्या बातम्याABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 14 January 2025Byculla Fake Currency : भायखळ्यात आढळून आलेल्या बनावट नोटांचे धागेदोरे थेट पालघरपर्यंत..

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Accident : 135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
135 रुपयांचा टोल चुकवण्यासाठी टेम्पो दुसऱ्या रस्त्याने वळवला अन् घात झाला, नाशिकच्या अपघातापूर्वी नेमकं काय घडलं?
गौतमी गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
गंभीरनंतर आता हिटमॅन अजित आगरकरवरही रुसला? चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी BCCI च्या गोटातून महत्त्वाची बातमी
Inflation Rate : सर्वसामान्यांना दिलासा, डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? सर्वांचं लक्ष 
डिसेंबर महागाई दर घटला, आरबीआय व्याज कपातीबाबत मोठा निर्णय घेणार का? फेब्रुवारीत बैठक
Nashik News: मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
मनमाड बाजार समितीत व्यापाऱ्यांचा बंद, शेतकरी नाराज; बाजार समिती फी 75 पैसे करण्याची मागणी
Chhatrapati Sambhaji Nagar Crime: छ. संभाजीनगरमध्ये तलवारी घेऊन पाठलाग, भररस्त्यात एकावर वार, हिस्ट्रीशीटर गुन्हेगाराची दहशत
छ. संभाजीनगरमध्ये भररस्त्यात थरारक घटना, तलवार घेऊन फळविक्रेत्याचा पाठलाग, दहशतीने नागरिक धास्तावले
Share Market Crash : शेअर बाजार कोसळला, चार दिवसात गुंतवणूकदारांचे 24.69 लाख कोटी बुडाले, कारण समोर
भारतीय शेअर बाजारात लाल चिखल, सेन्सेक्स-निफ्टी कोसळली, गुंतवणूकदारांचे एका दिवसात 12.61 लाख कोटी बुडाले
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; जितेंद्र आव्हाडांचा प्रताप सरनाईकांना सल्ला
'देवेंद्र फडणवीसांसोबत जुळवून घ्या, कुठल्याही लफड्यांमध्ये...'; आव्हाडांचा सरनाईकांना सल्ला
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
निवडणुकीत जात-धर्म आणला जातो, सिल्लोडची पुढची विधानसभा लढणार नाही; अब्दुल सत्तारांची मोठी घोषणा
Embed widget