एक्स्प्लोर
CAA, NRC लोकांपर्यंत पोहोचवण्यात सरकार कमी पडलं; प्रकाश जावडेकरांची कबुली
सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीवरुन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना विसरल्याचा आरोपही यावेळी जावडेकर यांनी केला.

नवी दिल्ली : सुधारित नागरिकत्व कायदा आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीसंदर्भात शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेवर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जोरदार टीका केलीय. काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेल्यावर शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांना हिंदूहृदयसम्राटही म्हणत नाही आणि त्यांचे विचारही विसरल्याचा आरोप जावडेकरांनी केलाय. तर देशभरातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर सीएए आणि एनआरसीबाबत योग्य संदेश पोहोचवण्यात सरकार कमी पडल्याचंही जावडेकरांनी मान्य केलंय.
बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे निर्वासीतांना शरण देऊ आणि घुसखोरांना हाकलून देऊ. पण शिवसेनेने सध्या आपली भूमिका बदलली आहे. त्यामुळे ते आता बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राटही म्हणत नाही. बाळासाहेबांचे बांगलादेशवासी आणि घुसखोरांविषयीचे विचारही शिवसेना विसरल्याचा आरोप केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केला. तर सुधारित नागरिकत्व कायदा आल्यानंतर तो लोकांपर्यंत योग्य पद्धतीने पोहचवण्यास कमी पडल्याचेही त्यांनी मान्य केलं. हा कायदा पास झाल्यानंतर लोकांशी आमचा योग्य संवाद झाला नाही. याचाच फायदा घेत काँग्रेससह विरोधी पक्षांनी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण केला. मात्र, आता आमच्याकडून सीएएविषयी जनजागृती होत आहे. गावागावात जाऊन आम्ही लोकांना सीएए समजावून सांगत आहे.
सीएए आणि एनआरी विरोधात काँग्रेस आक्रमक -
देशभरात सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेसच्या स्थापना दिवसाचं औचित्य साधत काँग्रेसनं शुक्रवारी मुंबईत सीएए आणि एनआसी कायद्याविरोधात शांतीमार्च काढला. गवालिया टँकजवळच्या तेजपाल हॉल ते गिरगाव चौपाटीपर्यंत हा मार्च काढण्यात आला. काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित होते.
भाजप सीएएच्या समर्थनार्थ रस्त्यावर -
सध्या देशभर सीएए आणि एनआरसीच्या विरोधात आंदोलनं सुरु आहेत. यात बऱ्याच ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या. अशातच आता भाजप देखील सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानावर सीएएच्या समर्थनात भाजने रॅली काढली. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या रॅलीचे नेतृत्व केले.
हेही वाचा - दिल्लीवाले कधी कोणता कायदा आणतील याचा नेम नाही; गीतकार गुलजार यांचा मोदी-शाहांवर निशाणा
Prakash Javadekar | विश्वासघाताची किंमत शिवसेनेला चुकवावी लागली : प्रकास जावडेकर | ABP Majha
[00:02:17]
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
महाराष्ट्र
क्राईम























