एक्स्प्लोर
पोलीस अधिकाऱ्याचा रशियन महिलेवर बलात्कार, चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार
पीडिता मूळची रशियाची असून 2003 ला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत आली होती. इमिग्रेशन कार्यालयात व्हिसा मुदतवाढीसंदर्भात तिची या पोलीस अधिकाऱ्याशी ओळख झाली होती.

मुंबई : चेंबूर पोलीस ठाण्यात एका रशियन नागरिक असलेल्या महिलेने गेली 12 वर्ष आपल्यावर एक पोलीस अधिकारी बळजबरीने बलात्कार करीत असल्याचे आणि त्याने आपला वारंवार गर्भपात केला असल्याचे आरोप करीत गुन्हा दाखल केला आहे. 2003 साली व्हिजा वाढवून देण्याच्या बहाण्याने या पोलीस अधिकाऱ्याची आपल्याशी ओळख झाली. परंतु त्याने मला गुंगीचे औषध देऊन वारंवार बलात्कार केला, आपल्या मुलाला आणि मला देखील मारण्याचा प्रयत्न केल्याचे तिने जबाबात म्हटले आहे. तसेच त्याने एक तरुणीचा आणि तिचा भावाचा खून आपल्या समक्ष केला असून त्याला पुण्यात एका ठिकाणी गाडले असल्याचे देखील ती म्हणाली. या प्रकरणी तिचे वकील नितीन सातपुते यांनी माध्यमांना या प्रकरणाची सविस्तर माहिती देत कडक कारवाई ची मागणी केली. पीडिता मूळची रशियाची असून 2003 ला अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी मुंबईत आली होती. इमिग्रेशन कार्यालयात व्हिसा मुदतवाढीसंदर्भात तिची या पोलीस अधिकाऱ्याशी ओळख झाली होती. त्यादरम्यान या पोलिसाने तिचे व्हिजा जमा करून घेतला होता मात्र अनेकदा मागणी करूनही ते परत केले नाही. तिच्या अडचणीचा फायदा उठवून आणि लग्नाचे आमिष दाखवत मागील 12 वर्षांपासून तिचा छळ करत आहे, असे तिने तक्रारीत म्हटले आहे. आरोपी पोलीस निरीक्षकाचे अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या टोळीशी लागेबांधे असून त्यासंबंधी त्याने एकाची हत्या केल्याचा दावाही तिने केला आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
निवडणूक
राजकारण
राजकारण























