एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

गणेशोत्सवाच्या वेळी जलप्रदूषण न करण्याचा संकल्प करा, पंतप्रधान मोदींचे आवाहन

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. मेट्रोच्या तीन मार्गिकांचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला.

मुंबई : गणेश विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण करू नका. आपल्याला संकल्प करायचा आहे की विसर्जनानंतर समुद्रातील घाण साफ करू. समुद्र आणि मिठी नदी प्लास्टिकमुक्त करू. प्रदूषण वाढवणारा गणेशउत्सव आपल्याला करायचा नाही, विसर्जनाच्या वेळी जलप्रदूषण करू नका, प्लास्टिकमुक्त विसर्जन करा असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. यावेळी त्यांनी एक भारतीय- एक संकल्प करण्याचे देखील आवाहन केले. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते विविध विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. मेट्रोच्या तीन मार्गिकांचं भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी पंतप्रधान मोदी यांनी मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रामदास आठवले आदी उपस्थित  होते. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने केली. 'गणशोत्सवाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा' अशा शब्दात मराठीत शुभेच्छा देत त्यांनी भाषण सुरु केले. सुरुवातील त्यांनी  उद्धव ठाकरे यांचा लहान भाऊ म्हणून उल्लेख केला. यावेळी ते म्हणाले की, मी रशियात होतो तरी मुंबईचा पाऊस आणि पाण्याच्या स्थितीबाबत अपडेट घेत होतो. यावेळी इसरोच्या वैज्ञानिकांचं कौतुक करताना ते म्हणाले की, आव्हानांचा सामना करत पुढे जाणारे लोकच मोठे होतात.  मिशन चांद्रयानमध्ये एक अडथळा आला आहे. मात्र आपले बहादूर वैमानिक हटणार नाहीत, चंद्रावर पोहोचायचं स्वप्न पूर्ण होणारच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की,  गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर हजारो करोड रुपयांच्या योजनांचा श्रीगणेशा होत आहे. 20 हजार कोटींहून अधिक रुपयांचे काम आज सुरु होत आहे याचा आनंद आहे. हे सर्व प्रकल्प मुंबईच्या विकासासाठी महत्वपूर्व साध्य होतील. कमी वेळात मुंबईत प्रवास होईल. मुंबईच्या वेगाने देशाला वेग दिला आहे, असेही ते म्हणाले. फडणवीस सरकारने मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी  खूप प्रयत्न केलेत ते मी स्वतः पाहिलेत. फडणवीस यांनी महाराष्ट्रातील प्रकल्पांवर वेगाने काम केलं आहे, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे कौतुक केले. आगामी काळात आधुनिक पायाभूत सुविधांवर 100 लाख कोटी रुपये खर्च करणार आहोत. देशभरात मोबिलिटी, ट्रान्सपोर्टला मजबूत करण्यावर जोर दिला जात आहे. आज ज्या वेगाने काम होत आहे तसे  आधी कधीच झाले नाही, असेही मोदी म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 7PM TOP Headlines 7 PM 26 November 2024Pan 2.0 : केंद्र सरकारकडून पॅन 2.0 या योजनेला मंजुरी, पॅन कार्डमध्ये बदल होणारEknath shinde On CM : शिंदे फडणीसांपासून लांब,  मुख्यमंत्रिपदावरुन एकनाथ शिंदे नाराज?ABP Majha Marathi News Headlines 6PM TOP Headlines 6 PM 26 November 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
अशा निवडणुका पाकिस्तानातही होत नाहीत, निवडणूक आयोग जिवंत आहे का; संजय राऊतांकडून व्हिडिओ शेअर
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी;  शेजारील कुटुंब भयभीत
सोसायटीतील उंच 13 व्या मजल्यावर भीषण आग, संसाराची राखरांगोळी; शेजारील कुटुंब भयभीत
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
निवडणूक झाली, निकाल लागला, आता नोकरीचं बघा; 219 जागांसाठी जाहिरात, लवकरच करा अर्ज
Jalgaon : लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
लाडक्या नवरीला घेऊन जाण्यासाठी नवरदेवाने थेट हेलिकॉप्टरच आणलं,  चाळीसागावातील एका लग्नाची गोड गोष्ट
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Udayanraje: उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
उदयनराजेंचं लॉबिंग, 4 आमदारांसह घेतली, फडणवीस-अजित पवारांची भेट; हवंय मंत्रिपद
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
महायुतीच्या महाविजयानंतर ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह, तिकडे सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्याला चांगलंच झापलं
Embed widget