(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दादरमध्ये जलवाहिनी फुटली; शुक्रवारी एफ दक्षिण- एफ उत्तर विभागात पाणीपुरवठा राहणार बंद
Mumbai: दादरमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटली आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे.
Mumbai: दादरमधील पारसी जिमखान्यासमोर जलवाहिनी फुटली आहे. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू आहे. यामुळे गुरुवारी ( 8 जुलै रोजी) मुंबई महानगरपालिकेच्या एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात सकाळी पाणीपुरवठा बंद करण्यात आला, अशी माहिती पालिकेने दिली आहे. जलवाहिनी दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दादर (पूर्व) मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर पारसी जिमखाना समोर 1200 मिमी व्यासाची (न्यू तानसा) जलवाहिनी फुटल्यामुळे जलवाहिनी दुरुस्तीचे काम जलकामे विभागाद्वारे युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. याबाबत माहिती देताना बीएमसीने (Brihanmumbai Municipal Corporation ) सांगितले की, जलवाहिनी फुटल्याचा परिणाम म्हणून शुक्रवार (8 जुलै 2022 रोजी) एफ दक्षिण आणि एफ उत्तर विभागात सकाळी 4 ते सकाळी 10 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणी पुरवठा बंद राहिल्याने एफ / उत्तर विभागातील दादर पूर्व, माटुंगा, वडाळा, पारसी कॉलनी आणि हिंदू कॉलनीत पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर एफ/दक्षिण विभागात दादर, नायगाव, लालबाग, वडाळा, परळ, काळाचौकी आणि शिवडी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. दरम्यान, बीएमसी कर्मचाऱ्यांकडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या:
- Amol Mitkari : ... म्हणून आपली भूमिका संशयाच्या भोवऱ्यात, अमोल मिटकरींनी राज्यपालांना दिलं संविधानाच्या प्रतीसह खरमरीत पत्र
- Ashish Jaiswal Exclusive : राऊत-परब-देसाई-गोऱ्हे यांनी त्रास दिला; ठाकरेंची शेवटची मनधरणी करणारे आ. आशिष जयस्वाल यांची स्फोटक मुलाखत
- गोविंद पानसरे हत्या प्रकरणात इतक्या वर्षांत काय केलं? एसआयटीला तपासाचा अहवाल सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
- Eknath Shinde : स्वागत, सजावट आणि पूजा... मंत्रालयातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले कामकाजाला प्रारंभ
- Maharashtra : उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का, 'मविआ' सरकारने केलेल्या बदल्या रोखल्या