एक्स्प्लोर

ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान

पावसाळा सुरू असल्याने सध्या विजेच्या तारा तुटणे, झाडपडी होणे आणि लाईट जाणे हे प्रकार सर्रास होत असतात.

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची  येथे विजेचा धक्का बसल्याने जवळपास 24 म्हशींचा मृत्यू झाला आहे. पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या या 24 म्हशी (Buffalo) होत्या. गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात उतरल्या. मात्र, विजेची तार (Electricitiy) तुटून त्या ओढ्यात पडली होती. त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला आणि या दुर्दैवी घटनेत 24 मुक्या जीवांचा मृत्यू झाला. या घटनेनं गावात हळहळ व्यक्त होत आहे. त्यासोबतच, भजनावळे यांचं मोठं आर्थिक नुकसानही झालं आहे.

पावसाळा सुरू असल्याने सध्या विजेच्या तारा तुटणे, झाडपडी होणे आणि लाईट जाणे हे प्रकार सर्रास होत असतात. पावसामुळे अनेकदा वीजपुरवठा खंडीत होतो, पण तो खंडीत पुरवठा सुरळीत झाल्यानंतर काही ठिकाणी पडलेल्या वीजेच्या तारांमुळे वीजेचा प्रवाह इतरत्र वाहतो. वीजेचा हा वाहणारा प्रवाह अनेकदा मोठ्या दुर्घटनेस कारणभूत ठरतो. त्याचप्रमाणे आता मुक्या जीवांसाठी हा करंट कर्दनकाळ ठरला आहे.  

उत्तर सोलापूर तालुक्यातील गुळवंची येथील एका ओढ्याच्या पाण्यात करंट उतरला होता, याची कल्पना पशुपालक भजनावळे यांना नव्हती. मात्र, चरण्यासाठी सोडण्यात आलेल्या म्हशी पाण्यात उतरल्या आणि ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान, पाण्यात उतरलेल्या म्हशींसोबत दुर्घटना घडल्याचं लक्षात येताच भजनावळे यांनी उर्वरित म्हशींना पाण्यात जाण्यापासून रोखले. त्यामुळे त्या उर्वरीत चार म्हशीचा जीव वाचला आहे. दरम्यान, या घटनेची कल्पना तात्काळ महसूल प्रशासनाला देण्यात आली आहे. महसूल प्रशासनाने पंचनामा करुन नैसर्गिक आपत्तीमधून संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक मदत करावी, अशी मागणी गुळवंची ग्रामस्थांनी केली आहे. 

हेही वाचा

महायुतीचा 'मुख्यमंत्री'पदाचा चेहरा कोण असेल?; विधानपरिषद मिळताच पंकजांचं आश्चर्यकारक उत्तर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं विधान
Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; शहीद प्रवीणच्या मित्राने आठवणींनी जागवली रात्र
4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; शहीद प्रवीणच्या मित्राने आठवणींनी जागवली रात्र
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Dhangar Samaj on CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात घेराव घालू, धनगर समाजाचा इशाराEknath Shinde On Worli Hit And Run : कुणालाही पाठिशी घालणार नाही, 'हिट ॲण्ड रन'बाबत शिंदेंची ग्वाहीTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 1 PM : 07 जुलै 2024: ABP MajhaRain Superfast news : तुमच्या जिल्ह्यातील पाऊस पाणी : 7 जुलै 2024 : 12 PM : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
तुम्ही सर्वमान्य तोडगा काढा, मी तुम्हाला पाठिंबा देतो, आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं प्रथमच जाहीर भाष्य 
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं मोठं विधान
'टीम इंडिया रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली चॅम्पियन्स ट्रॉफी अन् WTC जिंकणार; जय शाह यांचं विधान
Kolhapur Rain Update : पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
पंचगंगा नदी मोसमात प्रथमच पात्राबाहेर; कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली
4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; शहीद प्रवीणच्या मित्राने आठवणींनी जागवली रात्र
4 महिन्यांपूर्वी स्वत:च्या लग्नासाठी गावाकडं आला तो शेवटचाच; शहीद प्रवीणच्या मित्राने आठवणींनी जागवली रात्र
Eknath Shinde : कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका
कट, करप्शन आणि कमिशन हाच काँग्रेसचा त्रिसूत्री विचार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काँग्रेसवर बोचरी टीका
Chhagan Bhujbal : 'छगन भुजबळांची महायुतीत घुसमट'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा खळबळजनक दावा
'छगन भुजबळांची महायुतीत घुसमट'; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याचा खळबळजनक दावा
Arjun Khotkar on BJP : जरांगे पाटलांचा फटका बसणार सांगत होतो, भाजपनं मराठा समाजाविरोधात चुकीची भूमिका घेतली; शिंदे गटाच्या नेत्याचा थेट आरोप
जरांगे पाटलांचा फटका बसणार सांगत होतो, भाजपनं मराठा समाजाविरोधात चुकीची भूमिका घेतली; शिंदे गटाच्या नेत्याचा थेट आरोप
आजपासून विठुरायाचं 24 तास दर्शन सुरु, दररोज 1 लाखाहून अधिक भाविकांचं होणार दर्शन, देवाचे राजोपचार बंद
आजपासून विठुरायाचं 24 तास दर्शन सुरु, दररोज 1 लाखाहून अधिक भाविकांचं होणार दर्शन, देवाचे राजोपचार बंद
Embed widget