एक्स्प्लोर
कथित गोरक्षकांविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका
नागपूरमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन एका माजी भाजप पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्याचं प्रकरण ताजे असतानाच मुंबई उच्च न्यायालयात या कथित गोरक्षकांविरोधात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे.
![कथित गोरक्षकांविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका Pil Against So Called Gorakshaks In Mumbai Hc Latest Updates कथित गोरक्षकांविरोधात मुंबई हायकोर्टात जनहित याचिका](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/05/02123835/Mumbai-highcourt-660x400.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : नागपूरमध्ये गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन एका माजी भाजप पदाधिकाऱ्यावर झालेल्या हल्याचं प्रकरण ताजे असतानाच मुंबई उच्च न्यायालयात या कथित गोरक्षकांविरोधात जनहित याचिका सादर करण्यात आली आहे. गोरक्षकांकडून सर्वसामान्य जनतेवर होणाऱ्या हल्यांविरोधात हायकोर्टात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेत हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ता शादाब पटेल यांनी ही जनहित याचिका सादर केली आहे. हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात आणि सर्वसामान्य जनतेचं रक्षण करण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप यात करण्यात आला आहे.
गोहत्या आणि गोमांस विक्रीवर बंदी लागू झाल्यापासून देशभरात गोमांस बाळगल्याच्या संशयावरुन 24 लोकांची हत्या करण्यात आली. तर जमावाकडून अनेक लोकांवर प्राणघातक हल्ले करण्यात आले आहेत. अशाप्रकारे कायदा हातात घेणं चुकीचं असल्याचं याचिकाकर्त्यानं म्हटलं आहे.
आगामी बकरी ईदच्या निमित्तानं अश्या हल्ल्यांत आणखीन वाढ होण्याची भितीही याचिकेत व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे कायदेशीररित्या मांसाची विक्री करणाऱ्या तसेच मांसांची ने-आण करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या रक्षणाची जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. तसेच स्वसंरक्षणासाठी त्यांना शस्त्र परवाने देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे. लवकरच या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणं अपेक्षित आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)