एक्स्प्लोर
Advertisement
काँग्रेसशी युतीच्या चर्चेचा प्रश्नच नाही : आशिष शेलार
मुंबई : मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक असावा, यावर भाजप ठाम आहे, त्यामुळे काँग्रेससारख्या पक्षाशी युती करण्याचा प्रश्नच नसल्याचं मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. शेलारांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला सूचक संकेत दिल्याचं म्हटलं जात आहे.
मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी शिवसेना आणि भाजप यांच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. मात्र बहुमताचा आकडा अर्थात मॅजिक फिगर गाठण्यासाठी दोन्ही पक्षांना इतर पक्ष किंवा अपक्ष नगरसेवकांची मोट बांधावी लागणार आहे. त्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक होत आहे.
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शक असावा, या मुद्द्यावर भाजप ठाम आहे, त्यामुळे काँग्रेससारख्या पक्षाशी युतीची चर्चा किंवा तडजोड करण्याचा प्रश्नच नसल्याचं शेलार यांनी बैठकीपूर्वी सांगितलं.
'वर्षा'वर भाजपचे सर्व आमदार, खासदार यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. दोन तास रंगलेल्या चर्चेत सगळ्यांनी आपल्या भूमिका मांडल्याचं शेलार यांनी सांगितलं. त्यानंतर 'वर्षा'वर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे.
मुंबई महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि भाजप हे दोन्हीही पक्ष 114 या मॅजिक फिगरपासून दूर आहेत. भाजपला 82, तर शिवसेनेला 84 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे दोन्हीही पक्षांनी सत्तेची गणितं जुळवण्यास सुरुवात केली आहे.
मुंबईत शिवसेनेला 84 (अपक्षांचं बळ लाभल्यानंतर 88), भाजपला 82, काँग्रेसला 31, राष्ट्रवादी काँग्रेसला 9, मनसेला 7 आणि इतरांना 14 जागा मिळाल्या आहेत. या गणितात काँग्रेसला साहजिकच महत्त्व आहे.
काँग्रेसच्या पाठिंब्यासाठी शिवसेनेने पावलं टाकण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. मुंबईचा महापौर आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच राहील, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अगोदरच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे शिवसेनेचा महापौर बसवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले जातील आणि त्यानंतर राज्य सरकारच्या पाठिंब्याबाबतही निर्णय घेतला जाईल, असाही गर्भित इशारा उद्धव ठाकरेंनी दिला आहे.
काँग्रेसकडूनही शिवसेनेला पाठिंबा देण्याची तयारी दाखवण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेनेने काँग्रेसची साथ घेतल्यास मॅजिक फिगर गाठणं शिवसेनेला कठीण जाणार नाही. मात्र शिवसेना आणि भाजप आता कोणती पावलं टाकतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
क्राईम
राजकारण
राजकारण
Advertisement