एक्स्प्लोर
महापालिका, सीएसटी स्थानकाच्या इमारतीसमोर नवा सेल्फी पॉईंट!

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीनंतर दादरच्या शिवाजी पार्कमधील सेल्फी पॉईंटवरुन बरंच राजकारण तापलं होत. यामध्ये शिवसेना, मनसे, भाजप यांच्यात बरीच जुंपली होती. मात्र, आता शिवसेनेनं मुंबईतल्या महानगरपालिका आणि सीएसटी स्थानकाच्या इमारतीसमोर नवा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला.
युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या सेल्फी पॉईंटचं उद्घाटन करण्यात आलं. सीएसटी स्थानक आणि पालिका इमारतीच्या मधल्या चौकात उभारलेल्या या दर्शनी गॅलरीमुळे पर्यटकांना एकाच ठिकाणी उभं राहून सीएसटीचा सगळा परिसरत पाहता येणार आहे. या दर्शनी गॅलरीसाठी ९० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत.
फोटो काढण्यासाठी रस्त्यावर होणारी गर्दी कमी झाल्यानं वाहतुकीला होणारा अडथळाही कमी होणारा आहे. येत्या काळात सीएसटीच्या संपूर्ण परिसरालाच हेरिटेज स्वरुप देण्यात येणार आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
विश्व
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
