एक्स्प्लोर
500-1000 च्या नोटा नाकारल्याने 4,267 रुपयांची चिल्लर दिली!

ठाणे : ठाण्यात चंदनवाडी दत्तमंदिराजवळ रहाणारे नारायण थिटे यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नाकारणाऱ्या टोयोटा कंपनीच्या सर्व्हीस सेंटरला चांगलाच धडा शिकवला. बिलाची रक्कम चुकवताना 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा स्वीकारणार नसल्याचे कंपनीने सांगितल्यानंतर थिटेंनी थेट चिल्लरच दिली.
नारायण थिटे यांच्या मालकीची टोयोटा क्वालिस गाडी आहे. त्यांनी शुक्रवारी आपली गाडी सर्व्हिसिंगसाठी या वागळे इस्टेट येथील टोयोटाच्या सेंटरमध्ये दिली होती. त्यावेळी त्यांनी गाडीचे काही स्पेअर पार्टस विकत घेतले. त्याचे बिल 4,267 रुपये झाले. थिटे यांनी 500 आणि 1000 च्या नोटा पुढे करताच कर्मचाऱ्यांनी नोटा घेण्यास नकार दिला.
फोटो सौजन्य - विशाल हळदे, ठाणे
सरकारने वारंवार सांगूनही शुल्लक कारण सांगत अडवणूक करणाऱ्या टोयोटाच्या व्यवस्थापनाला नारायण थिटे यांनी धडा शिकवायचं ठरवलं.
थिटे घरी गेले त्यांनी बिलाच्या रक्कमेची चिल्लर गोळा केली आणि शनिवारी पुन्हा टोयोटाच्या सेंटरमध्ये गेले. त्यावेळी स्पेअर पार्टसचे बिल चुकवण्यासाठी त्यांनी चिल्लरची थैली दिली. सर्व्हिस सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी आधी नकारघंटा वाजवली. पण चिल्लर कायदेशीर पैसा असल्याचे खडसावताच कर्मचाऱ्यांनी चिल्लरमधले बिल स्वीकारले.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
भंडारा
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
