एक्स्प्लोर
रेल्वे स्थानकावर भरगर्दीत माथेफिरुनं तरुणाला भोसकलं, थरार सीसीटीव्हीत कैद
मुंबई: विरार रेल्वे स्थानकावर एका माथेफिरुनं तरुणाची धारदार चाकूने हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हत्येचे कारण अजून स्पष्ट झालेले नाही. परंतु हत्या करणाऱ्या तरुणाला विरार पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर हत्या करणारा तरुण पाच मिनिटे ब्रिजवर हातात चाकू घेऊन फिरत होता. ही घटना रेल्वेच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रेल्वेच्या आर.पी.एफ. जवानांनी त्याला मोठया शिताफीने पकडलं.
या घटनेनं प्रवाशांची मोठी धावपळ सुरु होऊन काही वेळ त्या ठिकाणी दहशत पसरली होती. हत्या झालेल्या तरुणाची ओळख अजून पटलेली नसून, हत्या रेल्वेत वर्ग करायची किंवा विरार पोलिस ठाण्यात याबाबात दोघांत उशिरापर्यंत संमभ्र होता.
विरार रेल्वे स्थानकाचे पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या रेल्वे ब्रिजवरती एका माथेफिरु तरुणाने आज सकाळी दहाच्या सुमारास हातातील धारदार चाकूने ३० ते ३५ वयोगटातील इसमाची हत्या केली. महेंद्र कुमार पाल नाव आणि दहिसर येथील रहिवासी असल्याचे हा माथेफिरु सध्या सांगत आहे. परंतु त्याने ही हत्या का व कशासाठी केली याचे कारण मात्र स्पष्ट झाले नाही.
रेल्वे स्थानकात अनेक फेरीवाले आणि गर्दुल्यांचा वावर मोठ्या प्रमाणात होत असल्याने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement