एक्स्प्लोर
मुस्तफा डोसा मध्यरात्री रुग्णालयात, अधिकाऱ्यांची धावपळ
मुंबई: मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटात महत्त्वाची भूमिका बजावणारा दोषी आरोपी मुस्तफा डोसाच्या अचानक छातीत दुखू लागलं. त्यामुळे काल रात्री 1 वाजता त्याला मुंबईतील जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रुग्णालयात त्याच्यावर तीन तास उपचार करण्यात आले. त्यानंतर त्याला पुन्हा आर्थर रोड जेलमध्ये पाठवण्यात आलं.
अनियंत्रित अतितणाव आणि छातीतील संसर्गामुळे डोसाला हा त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची धावाधाव
मुस्तफा डोसासारख्या खतरनाक गुंडाची तब्येत बिघडल्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांची एकच धावपळ उडाली. जेल अधीक्षकांपासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनीच जे जे रुग्णालयात हजेरी लावली.
दरम्यान, 1993 च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी मुस्तफा डोसाला विशेष टाडा न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. याप्रकरणी सीबीआयचे वकील दीपक साळवी यांनी डोसाला फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे.
न्यायालय दोषींना काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्लाह शेख यांना दोषी ठरवण्यात आलं आहे.
12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडली होती. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला.
संबंधित बातम्या
मुंबईतील 1993 बॉम्बस्फोटप्रकरणी 6 दोषी, 1 निर्दोष
रमजाननिमित्त मुस्तफा डोसाला हवेत नवे कपडे आणि मिठाई
अबू सालेम, मुस्तफा डोसा दोषी? 29 मे रोजी निकाल
अबू सालेम असलेल्या तळोजा जेलमध्ये कैदी-पोलिसांची मैफील
कबूल है, मी निकाहसाठी तयार; डॉन अबू सालेम पुन्हा बोहल्यावर चढणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्राईम
Advertisement