एक्स्प्लोर

स्कूल बसमध्ये गिअरऐवजी बांबू, अपघातानंतर धक्कादायक प्रकार उघड

कायदा पायदळी तुडवल्याचं लक्षात आल्यानंतर बिझनेसमनने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली. मात्र नंतर जामीनावर त्याची सुटकाही झाली.

मुंबई : मुंबईतील सांताक्रूझ इथल्या पोदार इंग्लिश स्कूलच्या बसमध्ये गिअरऐवजी बांबू लावल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बसने मंगळवारी (5 फेब्रुवारी) एका कारला धडक दिली. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. खाररोड पोलिसांनी या प्रकरणी बस चालकाला अटक केली. सांताक्रूझच्या पोदार एज्युकेशनल कॉम्पेक्सच्या स्कूल बसच्या चालकाने गिअरऐवजी बांबू लावून विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घातला होता. या बस चालकाने मंगळवारी सकाळी खारमधील रहिवासी असलेल्या एका बिझनेसमनच्या बीएमडब्लू कारला मधू पार्क इथे धडक दिली. यानंतर बिझनेसमनने पाठलाग करुन बस थांबवली. यावेळी चालक राज कुमार (वय 21 वर्ष) गिअरऐवजी बांबू टाकल्याचं पाहिलं. कायदा पायदळी तुडवल्याचं लक्षात आल्यानंतर बिझनेसमनने पोलिसांना फोन करुन याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने अटक करण्यात आली. मात्र नंतर जामीनावर त्याची सुटकाही झाली. गिअर लिवरमध्ये बिघाड झाल्यामुळे त्याऐवजी बांबूचा वापर केल्याची सारवासारव चालकाने केली. तसंच दुरुस्तीसाठी वेळ न मिळाल्याने तीन दिवस गिअरऐवजी बांबू वापरत असल्याचंही त्याने सांगितंलं. याबाबत शाळेला माहिती दिली असून आवश्यक पावलं उचलण्यास सांगितल्याची माहिती खार पोलिसांनी दिली आहे. दुसरीकडे पोलिसांनी पुढील कारवाईसाठी हे प्रकरण आरटीओकडे सोपवलं आहे. बसमधील विद्यार्थी सुखरुप असल्याचं शाळेतर्फे सांगण्यात आलं आहे. शाळा तसंच शाळा वाहतूक समिती या प्रकरणाचा तपास करत असून प्रशासनाला मदत करत आहे. सगळ्या स्कूलबसचं लवकरच ऑडिट केलं जाईल. या प्रकारची घटना पुन्हा होऊ नये यासाठी शाळा पुन्हा एकदा सगळ्या कंत्राटी चालक आणि स्टाफला प्रशिक्षण देणार आहे, असंही शाळेने जारी केलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Horoscope Today 22 November 2024 : आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शुक्रवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
Maharashtra Vidhan Sabha Election Exit Poll: विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, महाविकास आघाडीसाठी आनंदाची बातमी
विधानसभा निवडणुकीचा आणखी एक एक्झिट पोलचा निकाल, मविआसाठी आनंदाची बातमी
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Embed widget