Mumbai Coronavirus Update: मुंबईकरांना मोठा दिलासा; दैनंदिन रुग्णांच्या संख्येत मोठी घट, पाहा आजची ताजी आकडेवारी
Mumbai Coronavirus Update: मुंबईने कोरोना मुक्तच्या दिशेने वाटचाल सुरु केलीय.
Coronavirus In Mumbai: मुंबईवरील कोरोना संसर्गाचा विळखा दिवसागणिक सैल होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या काही दिवसानंतर सर्वात कमी रुग्णांची नोंद झालीय. मुंबई महापालिका क्षेत्रात आज 267 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडलीय. तर, दुसरीकडे 420 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याचबरोबर मागील 24 तासात 4 जणांचा मृत्यू झालाय. आजची आकडेवारी मुंबईतील नागरिकांना दिलासा देणारी ठरतेय.
मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या आता वेगाने खाली येताना दिसत आहे. मुंबईत आज 267 नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत आज 420 रुग्ण करोनामुक्त झाले. आतापर्यंत एकूण 7 लाख 33 हजार 738 रुग्णांनी करोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 97 टक्के इतके आहे. मुंबईत 25 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत कोविड रुग्णवाढीचा दर 0.04 टक्के इतका राहिला असून रुग्णदुपटीचा कालावधी 1 हजार 595 दिवसांवर जाऊन पोहचला आहे.
याशिवाय, राज्यातील रुग्णसंख्येतही घट झालीय. राज्यात आज 809 नवे रुग्ण आढळले असून 10 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय, 1 हजार 901 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 66 लाख 11 हजार 887 वर पोहचलीय. राज्यातील रुग्ण बरे होण्याचा दर 97. 59 टक्के झालाय. तर, मृत्युदर 2.12 इतका आहे. राज्यात सध्या 1 लाख 60 हजार रुग्ण होम क्वारंटाईन आहेत आणि 993 रुग्ण वैद्यकीय संस्थामध्ये उपचार घेतायेत. महत्वाचे म्हणजे, राज्यात सध्या 15 हजार 552 रुग्ण सक्रीय आहेत.
राज्यात रविवारीपर्यंत (28 ऑक्टोबर) एकूण 9 कोटी 72 लाख 10 हजार 500 डोस देण्यात आले आहेत. यात पहिला आणि दुसऱ्या अशा दोन्ही डोसचा समावेश आहे. लसीकरणाच्या बाबत राज्य लवकरच 10 कोटींचा आकडा गाठण्याची शक्यता आहे.
संबंधित बातम्या-