एक्स्प्लोर

आज मुंबई-पुणे प्रवास करताय? एक्स्प्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक; दोन तास वाहतूक बंद

आज द्रुतगती पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जात आहे. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे.

Mumbai-Pune Express Way Update:  शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आता वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी आज द्रुतगती मार्गावर दोन तासांचा ब्लॉक घेतला जात आहे. ओव्हरहेड ग्रॅंटी म्हणजे स्वागत फलक लावण्यासाठी आज दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक घेतला जात आहे. किवळे ते सोमटने दरम्यान हे काम सुरू होत आहे. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे. दुपारी दोन वाजल्यानंतर हा मार्ग पुन्हा खुला करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील किवळे गावाजवळ मुंबई दिशेने ओव्हर हेड गॅन्ट्री उभारण्याचे काम शुक्रवारी करण्यात येणार आहे. या कामासाठी दुपारी 12 ते 2 या वेळेत पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेवरील वाहतूक किवळे ते सोमाटणे फाटादरम्यान बंद राहील, अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे.

किवळे ते सोमटणे फाटादरम्यान दोन तास वाहतूक बंद राहणार असल्याने वाहतूक किवळे ते देहू रोड मार्ग, राष्ट्रीय महामार्ग ४८ वरून तसेच सोमाटणे फाटा ते द्रुतगती मार्गावरील तळेगाव पथकर नाका मार्गे वळवण्यात येणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी ट्राफिक ब्लॉक दरम्यान द्रुतगती पर्यायी मार्गाचा वापर करावा. तसेच वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या 9822498224 या दुरध्वनी क्रमांकावर किंवा महामार्ग पोलीस विभागाच्या 9833498334 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही एमएसआरडीसीने केले आहे.

मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे महाराष्ट्रातीलच नाही तर देशातला एक महत्वाचा महामार्ग. रोज या मार्गावरुन हजारो गाड्या प्रवास करतात. राजधानीला जोडणारा हा महत्वाचा मार्ग असल्यानं 24 तास महामार्ग गाड्यांनी फुल्ल असतो. या महामार्गामुळं वाहतूक जितकी सुकर झालीय तितकंच यावर होणाऱ्या अपघातांमुळं मार्ग नेहमी चर्चेत असतो. सतत महामार्गावर अपघाताच्या घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यूनंतर या महामार्गाच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला. त्यानंतर विरोधकांनी यावरुन गदारोळही केला. त्यानंतर सरकारने तात्काळ पावले उचलत इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम सुरु करण्याचा निर्णय घेतला. 340 कोटींचा हा प्रकल्प असेल. यातील 115 कोटी उभारणी साठी तर उर्वरित 225 कोटी हे पुढील दहा वर्षाच्या देखभालीसाठी कंत्राटदाराला दिले जाणारे आहेत. 

काय आहे आयटीएमएस सिस्टिम

आयटीएमएस म्हणजे इंटिलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेन्ट सिस्टिम. या सिस्टिमद्वारे वाहतुकीचं नियंत्रण सॅटेलाईटद्वारे होईल. या प्रणालीमध्ये ड्रोनचाही वापर केला जाणार आहे. महामार्गावर प्रवेश करणाऱ्या प्रत्येक गाडीचा रेकॉर्ड ठेवण्यात येणार आहे. प्रवास पूर्ण होईपर्यंत त्या गाडीवर नजर ठेवली जाणार आहे. अपघात झाल्यास गाडीपर्यंत तातडीने मदत पोहोचेल. संपूर्ण रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं जाळं असेल. हे कॅमेरे लेन कटिंग करणाऱ्या वाहनांच्या नोंदी ठेवतील. त्याशिवाय अशा वाहनांना अडवण्याचे निर्देश पोलिसांना मिळतील, ज्यामुळे अशा वाहनांना अडवून संभाव्य अपघात टाळता येतील. 39  ठिकाणी वाहनांचा वेग मोजणारी यंत्रे असणार आहेत. 

आज मुंबई-पुणे प्रवास करताय? एक्स्प्रेस वेवर आज ट्रॅफिक ब्लॉक; दोन तास वाहतूक बंद

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती निधनानंतर एबीपी माझानं मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवरचा मध्यरात्रीचा प्रवास पूर्ण करुन या महामार्गातल्या त्रुटी सरकारला दाखवून दिल्या होत्या. त्याच रिपोर्टची दखल घेऊन अखेर सरकारनं महामार्ग सुरक्षेच्या दिशेनं मोठं पाऊल उचललेलं आहे. आता फक्त हा प्रकल्प तातडीने पूर्ण होऊन. प्रवाशांना सुरक्षा कवच मिळावं, इतकीच अपेक्षा आहे.

आयटीएमएस सिस्टीम काय आहे? 

ITMS - इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम
- वाहनं टेक्नॉलॉजी शी कनेक्ट असणं गरजेचं आहे.
- यासाठी व्हेईकल डिटेक्शन सेन्सर गरजेचं असेल, म्हणजेच वाहनात जीपीएस सारखे सेन्सर लावले जातील. 
- ब्लुटूथ आणि वाय-फाय चा यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होईल, जे हल्लीच्या वाहनात इन बिल्ड असतातच.
- सीसीटीव्ही द्वारे अपघात आणि वाहतूक कोंडीवर नजर ठेवली जाईल.
- अशावेळी द्रुतगती वरून धावणाऱ्या वाहनांना सेन्सरद्वारे अपघात अथवा वाहतूक कोंडीची माहिती पोहचेल, संभाव्य धोका पाहता ते वाहनावर आधीच नियंत्रण आणू शकतात.
- अवजड वाहनं द्रुतगती मार्गावर पार्क असतील तर त्याची ही कल्पना सेन्सर मुळं मिळेल
- अपघातानंतर घटनास्थळ क्षणार्धात लक्षात येईल अन तातडीची मदतही पोहचेल.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार

व्हिडीओ

Mahapalika Parishad Thane :अंगावर घेऊ नका, 'त्या' नेत्याचं नावं घेतलं तर शिंदेंची शिवसेना बदनाम होईल
Shrikant Shinde Majha Katta : पळवापळवी, राजकीय कलह ते युती, श्रीकांत शिंदेंसोबत माझा कट्टावर चर्चा
Uddhav Thackeray Full Speech : मुंबईचा घास भाजपला गिळू देणार नाही, 20 वर्षानंतर भावासमोर तुफान भाषण
Aaditya Thackeray Speech ShivajiPark: भरसभेत फडणवीसांची मिमिक्री, कोस्टल रोडवरून हल्लाबोल
Praniti Shinde on BJP :  काँग्रेस खासदार प्रणिती शिंदेची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
BMC : मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
मुंबईत मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर, महानगरपालिकेकडून 'दक्षता पथका'ची स्‍थापना
Share Market : शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांना अखेर दिलासा, एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
शेअर बाजारातील घसरणीला सहाव्या दिवशी ब्रेक, गुंतवणूकदारांनी एका दिवसात 1.22 लाख कोटी कमावले
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंकडून भाजपचा गेम; अंबरनाथ नगरपालिकेत राष्ट्रवादीचा उपनगराध्यक्ष, गणितच बिघडलं
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 जानेवारी 2026 | सोमवार
Nashik Crime News: भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
भंडाऱ्याच्या प्रसादावरून खटके उडाले, धाकट्या भावानेच थोरल्या भावाला संपवलं; नाशिकमध्ये रक्तरंजित थरार
राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार
राज ठाकरे म्हणाले, विमानतळाची जागा हडपण्याचा डाव; देवेंद्र फडणवीसांची घोषणा, मुंबईत तिसरं एअरपोर्ट उभारणार
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ आणि मोठं नुकसान
Tata ग्रुपचा एकेकाळी 1450 रुपयांवर असलेला शेअर 365 रुपयांवर पोहोचला, गुंतवणूकदारांमध्ये खळबळ
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
ठाकरेंच्या निशाण्यावरील अण्णामलाईची मुंबईतील भाजप आमदाराकडून पाठराखण; म्हणाले, ते IPS अधिकारी होते
Embed widget