(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Day : महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई पोलिसांनी जारी केली नियमावली, 'या' भागात उडणाऱ्या वस्तूंवर बंदी
Maharashtra Day 2023 : माहीम पोलिस स्टेशन, शिवाजी पार्क पोलिस स्टेशन, दादर पोलिस स्टेशन आणि वरळी पोलिस स्टेशनच्या हद्दीत कोणत्याही उड्डाणांना परवानगी दिली जाणार नाही.
Maharashtra Day : 1 मे 1st May रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त दादरच्या शिवाजी पार्कवर होणाऱ्या परेडच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सूचना जारी केली आहे. महाराष्ट्र दिनाच्या दिवशी शिवाजी पार्कच्या हद्दीत उडणाऱ्या बाबींवर बंदी घालण्यात येणार असून कलम 144 लागू करण्यात येणार आहे. मुंबई पोलिसांकडून अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्र दिनाच्या परेडदरम्यान काही व्हीआयपी दादरच्या शिवाजी पार्कला भेट देणार आहेत, त्यामुळे सर्व उडत्या वस्तूंवर बंदी घालण्यात येईल आणि शिवाजी पार्कच्या हद्दीत कलम 144 लागू करण्यात येईल. हा आदेश परिसरात २४ तास लागू राहणार आहे.
दहशतवादी शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात
पोलिसांनी अधिसूचना जारी केली आहे, ज्यात म्हटलंय की, शिवाजी पार्क, दादर, मुंबई येथे महाराष्ट्र दिनानिमित्त समारंभीय परेडदरम्यान, दहशतवादी/असामाजिक तत्व शांतता बिघडवण्यासाठी आणि मानवी जीवनाला गंभीर हानी पोहोचवण्यासाठी हवाई क्षेत्राचा वापर करण्याचा प्रयत्न करू शकतात. सामाजिक वाघातक घटक सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करण्याचाही प्रयत्न करू शकतात.
Mumbai| On Maharashtra Day, a parade is organised in the Shivaji Park ground in Dadar and VIP movement will be there. Flying objects banned in the Jurisdiction of Shivaji Park and section 144 to be issued for 24 hours: Mumbai Police pic.twitter.com/tXRYccGPO1
— ANI (@ANI) April 26, 2023
जनतेच्या सुरक्षेसाठी घेतलेला निर्णय
अधिसूचनेत म्हटलंय की, महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक सहभागी होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे दादरच्या शिवाजी पार्क परिसरात होणाऱ्या अघटीत कारवाया रोखण्यासाठी पुरेशी सुरक्षा तपासणी करणं आवश्यक आहे.
महाराष्ट्र दिनाच्या परेडनिमित्त मुंबई पोलिसांकडून निर्बंध आदेश जारी
महाराष्ट्र दिनानिमित्त औपचारिक परेड आणि सार्वजनिक कार्यक्रमाच्या दृष्टीने फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 (1974 चा कायदा II) चे कलम 144 जारी करण्यात आल्याचे निर्बंधांमध्ये म्हटलंय. या बंदीनुसार माहीम पोलीस स्टेशन, शिवाजी पार्क पोलीस स्टेशन, दादर पोलीस स्टेशन आणि वरळी पोलीस स्टेशनच्या हद्दीत कोणत्याही फ्लाइंग अॅक्टिव्हिटीला परवानगी दिली जाणार नाही. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी IPC कलम 188, 1860 अन्वये शिक्षा होईल.