Nagpur News : खुशखबर! मुंबई-नागपूर दरम्यान चालणार 'विशेष ट्रेन', जाणून घ्या वेळापत्रक
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
Train Between Mumbai to Nagpur: मुंबई आणि नागपूर प्रवास करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मध्य रेल्वेने या मार्गावर विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
ट्रेनची वेळ काय? ट्रेन कोणत्या स्टेशनवर थांबणार? कशी असणार ट्रेन?
गाडी क्र. 02139 सुपरफास्ट स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 16 एप्रिल रोजी 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15.32 वाजता नागपूरला पोहोचेल.
तर दादर, ठाणे, कल्याण, नाशिकरोड, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मुर्तजापूर, बडनेरा धामणगाव आणि वर्धा या थांब्यांवर ही गाडी थांबणार आहे.
या ट्रेनचं स्वरुप एक एसी 2-टायर, दोन एसी 3-टायर, 10 स्लीपर क्लास आणि 5 जनरल सेकंड क्लास (द्वितीय श्रेणी) असून दोन गार्ड ब्रेक व्हॅन देखील आहेत.
'विशेष ट्रेन'साठी आरक्षण सुरु
02139 साठी विशेष शुल्कावर बुकिंग ची बुकिंग रविवारी, 14 एप्रिल 2023 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या वेबसाइटवर विशेष शुल्कावर सुरु झाली आहे. तुम्ही तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी www.enquiry.indianrail.gov.in ला वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा NTES अॅप डाउनलोड करू शकता. या प्रकरणात, लोकांना स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करण्याची विनंती करण्यात आली आहे.
Train चा फुल फॉर्म काय?
भारतातच काय तर जगभरात सगळेच ट्रेनने (TRAIN) प्रवास करतात. आपला प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि कमी वेळेत होण्यासाठी सर्वात आधी ट्रेनचाच विचार सर्वांच्या मनात येतो. पण, देशात प्रवासासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या ट्रेनचा फुल फॉर्म नेमका काय? याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? ते जाणून घेऊयात...
आगगाडीला इंग्रजीत 'ट्रेन' म्हणतात. तर, हिंदीत लोक रेलगाडी किंवा लोहपथगामिनी म्हणतात. पण TRAIN या इंग्रजी शब्दाचा फुल फॉर्म Tourist Railway Association Inc. असा आहे. याला शॉर्ट फॉर्ममध्ये 'ट्रेन' म्हणतात. खरंतर, ट्रेन (TRAIN) हा शब्द देखील इंग्रजीतून घेतलेला नाही, तर तो फ्रेंच शब्द Trahiner पासून आला आहे. याचा अर्थ खेचणं किंवा लॅटिन भाषेत याला Trahere असं म्हणतात.
रेल्वेशी संबंधित या शब्दांचे फुल फॉर्म काय?
आपण दिवसातून अनेक वेळा IRCTC हा शब्द वापरतो. पण तुम्हाला या शब्दाचा फुल फॉर्म माहीत आहे का? तर, IRCTC चा फुल फॉर्म Indian Railway Catering and Tourism Corporation असा आहे. त्याचप्रमाणे, IRFC चा फुल फॉर्म Indian Railway Finance Corporation असा आहे. तर, IRCON चा फुल फॉर्म Indian Railway Construction Limited असा आहे. आणि RVNL चा फुल फॉर्म Rail Vikas Nigam Limited या अर्थाने वापरला गेला आहे.