एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Marathon : महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंचा ठसा
मुंबई मॅरेथॉनमधल्या महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंचा ठसा; मुंबई कस्टम्सच्या आरती पाटीलला रौप्य, तर नाशिकच्या मोनिका आथरेला कांस्यपदक
मुंबई : देशविदेशातल्या पंचावन्न हजारांहूनही अधिक धावपटूंचा सहभाग असलेल्या मुंबई मॅरेथॉनमधल्या विविध शर्यतींना आज भल्या पहाटे सुरुवात झाली. मुंबईतल्या गुलाबी थंडीमुळं यंदा मॅरेथॉनच्या वातावरणात मोठा उत्साह दिसून येत आहे. हौशी धावपटूंच्या फुल मॅरेथॉनला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आला. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री छगन भुजबळ यानी वरळी येथून ड्रीम रनला हिरवा कंदील दाखवला.
हाफ मॅरेथॉनमध्ये महिलांच्या गटात पारुल चौधरीनं पहिला क्रमांक पटकावला. मुंबई कस्टमची आरती पाटील दुसरी आली तर नाशिकच्या मोनिका आथरेला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. पुरुषांच्या गटचात तीर्थ पुन यानं पहिला क्रमांक पटकावला. मन सिंग दुसरा तर बिलाम्पाला तिसरा क्रमांक मिळाला. एकंदरीतचं मुंबई मॅरेथॉनमधल्या महिलांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीवर मराठमोळ्या धावपटूंनी आपला ठसा उमटवला.
तसेच एकवीस किलोमीटर्स अंतराच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीला वरळी डेअरी येथून सुरुवात झाली. या शर्यतीत देशविदेशातल्या धावपटूंचा समावेश आहे. या धावपटूंची कामगिरी मुंबई मॅरेथॉनचं मुख्य आकर्षण ठरतं आहे. या मुंबई मॅरेथॉनमध्ये जवळपास 55,322 धावपटू सहभागी झाले आहेत. 42 किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये 9,660 धावपटू, 21 किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये 15260 तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या ‘ड्रीम रन’मध्ये 19707 धावपटू सहभागी होणार आहेत. धावपटू सहभागी झाले आहेत. केनियाचा कॉसमस लगट आणि इथिओपियाची वर्कनेश अलेमू हे दोघे गतवर्षीचे विजेते होते. यंदाही त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. गेल्या वर्षी या दोघांनी मुंबई मॅरेथॉनमधील सर्वात वेगवान वेळेची नोंद केली होती.
एकूण सात मॅरेथॉन
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
पूर्ण मॅरेथॉन- पहाटे 5.15
10 किलोमीटर-स. 6.20
एलिट स्पर्धा -स. 7.20
अपंगांसाठी स्पर्धा – स. 7.25
ज्येष्ठ नागरिक – स. 7.45
ड्रीम रन – स. 8.05
वरळी डेअरी
अर्ध मॅरेथॉन-पहाटे 5.15
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement