एक्स्प्लोर

Mumbai Local Updates: बिघाड दुरुस्त, मात्र तरिही हार्बर रेल्वेसेवा विस्कळीतच; वाहतूक 20 ते 25 मिनिटं उशिरानं

Mumbai Local Updates: हार्बर रेल्वे वाहतूक वाशी-पववेल स्थानकांदरम्यान ठप्प झाली आहे. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

Mumbai Local Updates: सकाळी सकाळी कामाला जाण्यासाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना (Mumbai News) मनस्ताप सहन करावा लागणार आहे. मुंबईतील हार्बर रेल्वे मार्गावरची (Mumbai Harbour Local) लोकलसेवा ठप्प झाली होती. जुईनगरजवळ (Juinagar) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी (Vashi) ते पनवेल (Panvel) मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली होती. मात्र आता बिघाड दुरुस्त झाला आहे. मात्र तरिही हार्बर रेल्वे वाहतूक विस्कळीतच आहे. त्यामुळे लोकलच्या प्रवाशांची सकाळ त्रासदायक ठरली आहे.

हार्बर मार्गावरील बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत बिघाड दुरुस्त करण्यात आला. मात्र तरिही हार्बर मार्गावरील वाहतूक अद्याप उशिरानंच सुरू आहे. विस्कळीत असलेली उपनगरीय रेल्वेसेवा पूर्वपदावर येण्यास उशीर होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. बिघाड दुरूस्त होऊनही उपनगरीय रेल्वेसेवा 20 ते 25 मिनिटं उशिरानं सुरू आहे. तब्बल एक तास हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक ठप्प होती. लोकल सेवा विस्कळीत झाल्यानं सकाळी कामावर जाण्याच्या गडबडीत असणाऱ्या चाकरमान्यांना मोठा फटका बसणार आहे. 

ऐन सकाळी हार्बर रेल्वे वाहतूक मार्गावरील जुईनगर स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे वाशी ते पनवेल मार्गावरील लोकलसेवा ठप्प झाली होती. या तांत्रिक बिघाडामुळं हार्बर रेल्वेचं वाहतूक वेळापत्रक काहीसं मागे पडलेलं आहे. हार्बर रेल्वेवरुन धावणाऱ्या काही गाड्या उशिरानं धावत आहेत. सकाळच्या वेळी अनेक प्रवासी कार्यालयात जाण्यासाठी घराबाहेर पडतात. मुंबईसह उपनगरांतीन अनेक प्रवाशांना वाहतूकीसाठी सर्वात सोपा आणि जलद पर्याय म्हणजे, मुंबई लोकल. रेल्वे प्रशासनाकडून बिघाड दुरुस्त करण्यात आला आहे. मात्र तरिही हार्बर रेल्वे उशिरानंच धावत आहे. त्यामुळे सकाळी कार्यालय गाठण्यासाठी घराबाहेर पडलेल्या चाकरमान्यांना मनस्थाप सहन करावा लागत आहे. 

पाहा व्हिडीओ : Harbour Line : हार्बर रेल्वे मार्गावरील सिग्रल यंत्रणेतील बिघाड दुरुस्त, लोकल सेवा 25 मिनिटं उशीरानं

मुंबई लोकलच्या हार्बर रेल्वे मार्गावर वाशी आणि पनवेलचामध्ये जुईनगर या ठिकाणी सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती. मात्र, मुंबई ते वाशी हर्बल रेल्वे मार्गावर लोकल वाहतूक सुरळीत सुरू होती. प्रशासनानं युद्ध पातळीवर काम करुन बिघाड दुरूस्त केला खरा, पण तरिही अद्याप हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीतच आहे. सिग्नल यंत्रणेतील बिघाड दूर केल्यानंतर काही वेळातच मुंबई ते पनवेल दरम्यानची वाहतूक सुरळीत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. मात्र अद्याप तरी हार्बर रेल्वे मार्गाचं वेळापत्रक कोलमडलेलंच आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Pm Narendra Modi Rally Kolhapur : कोल्हापुरात मोदींचा इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोलSharad Pawar : शशिकांत शिंदेंना अटक केली तर संघर्ष उभा करणार, शरद पवारांचा इशारा ABP MajhaUjjwal Nikam BJP : उज्ज्वल निकम यांना भाजपचं तिकीट, उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारीEknath Shinde-Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे - देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Video: ''हनुमान जयंतीचा माझा जन्म...''; भाजपाकडून उमेदवारी जाहीर होताच उज्जल निकम बोलले, संविधान बदलाच्या प्रश्नावरही दिलं उत्तर
Dharmendra : धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,
धर्मेंद्रचे 'हे' 75 अनसीन फोटो पाहिलेत का? हेमा मालिनीसोबतचा पाहून म्हणाल,"सुपरस्टार जोडी"
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
VIDEO : हार्दिक पांड्याचा पारा चढला, भरमैदानात गोलंदाजावर चवताळला 
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
''काँग्रेसने कर्नाटकात एका रात्रीत मुस्लिमांना ओबीसी बनवलं, देशभरात हेच मॉडेल राबवायचा प्लॅन''; कोल्हापुरात मोदींचा हल्लाबोल
Eknath Shinde : आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, येड पेरलं आणि खुळं उगवलं अशी राहुल गांधींची अवस्था; एकनाथ शिंदेंची जहरी टीका
आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको, मुख्यमंत्री शिंदेंची राहुल गांधींवर जहरी टीका
Sunetra Pawar : बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
जळगाव ते मुंबई... मुंबई बॉम्बस्फोट, कोपर्डी, 26/11 दहशतवादी हल्ला; भाजपा उमेदवार उज्जल निकम कोण?
Embed widget