एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
महिलांच्या सुरक्षेसाठी मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये 'पॅनिक बटन'
मुंबई : रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न कायमच चर्चेचा विषय असतो. रेल्वेतून प्रवासादरम्यान महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावा लागतो, असे गेल्या काही वर्षांमध्ये सातत्याने समोर आलं आहे. मात्र, यावर मुंबई रेल्वेने जालीम उपाय शोधला आहे. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं असलेलं 'पॅनिक बटन' रेल्वे प्रशासनानं प्रत्यक्षात आणली आहे.
इमर्जन्सी आलार्म सिस्टीम म्हणजेच पॅनिक बटन आता रेल्वेमध्ये महिलांच्या डब्यात बसवले जाणार आहे. महिलांना प्रवासादरम्यान कोणतीही अडचण आली किंवा कोणताही अतिप्रसंग झाल्यास, या बटनाद्वारे संबंधित प्रशासनाला कळवू शकतात. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाचं हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबईतील माटुंगा वर्कशॉपमध्ये या पॅनिक बटनची चाचणी घेण्यात आली असून, ट्रायल म्हणून रेल्वेच्या चार यूनिट्समध्ये लावण्यात येणार आहे. त्यानंतर रेल्वेकडून सर्व ट्रेनमध्ये महिलांच्या डब्यात पॅनिक बटन बसवण्यात येणार आहे.
पॅनिक बटन कसं काम करेल?
लाल रंगाचं हे पॅनिक बटन असून, रेल्वेमध्ये महिलांच्या प्रत्येक डब्यात बसवले जाईल. महिलांच्या डब्यात प्रत्येक दोन सीट्सच्या मधोमध हे पॅनिक बटन असेल. जर एखादी महिला अडचणीत असेल, तर तिला पॅनिक बटन दाबावं लागेल. त्यानंतर डब्याच्या बाहेरील बाजूस ऑडिओ-व्हिडीओ सिग्नल दिला जाईल, त्यामार्फत बाहेरील लोकांना आणि प्लॅटफॉर्मवरील स्टाफना याबाबत कळेल. शिवाय, ट्रेनमधील कर्मचाऱ्यांनाही याची माहिती मिळेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्रीडा
क्राईम
क्रीडा
Advertisement