एक्स्प्लोर
तासाभराच्या खोळंब्यानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरु
प्रवाशांनी थेट ट्रॅकवर उतरुन रेलरोको केल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता सुरळीत झाली आहे
मुंबई: ऑफिसला जाण्याच्या वेळीच लोकलने दगा दिल्याने नायगावमध्ये प्रवाशांनी आक्रमक पवित्रा घेतला. प्रवाशांनी थेट ट्रॅकवर उतरुन रेलरोको केल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. त्यानंतर तासाभराच्या खोळंब्यानंतर लोकल वाहतूक सुरु झाली आहे.
चर्चगेटकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. ती आता सुरु झाली आहे.
सकाळी 7.50 वा ची वसई- अंधेरी लोकल रद्द केल्याने प्रवासी संतप्त झाले होते. रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही पूर्व सूचना न देता लोकल रद्द केल्याचा आरोप प्रवाशांनी केला होता .
नव्या वेळापत्रकात शनिवार - रविवारी काही गाड्या देण्यात आल्या आहेत, मात्र आज गाड्या रद्द केल्याने प्रवाशांनी रेल रोको केला. सुमारे तासभर या लोकल अडवून ठेवण्यात आल्या होत्या .
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement