एक्स्प्लोर

Mumbai Local MegaBlock: मुंबईकरांनो, मध्य रेल्वेवर 'मेगाब्लॉक'; प्रवासाचं नियोजन करा, मगच घराबाहेर पडा!

Mumbai Local MegaBlock: येत्या रविवारी म्हणजेच, 11 फेब्रुवारीला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbor Railway) मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत.

Mumbai Local MegaBlock: मुंबई :  मुंबईकरांनो, (Mumbai News) येत्या रविवारी कुठे बाहेर जाण्याचा प्लान करत असाल, तर त्यापूर्वी मुंबई लोकलचं वेळापत्रक (Mumbai Local Timetable) नक्की पाहाल आणि त्यानुसारच बाहेर जाण्याचा प्लान कराल. येत्या रविवारी म्हणजेच, 11 फेब्रुवारीला विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मध्य रेल्वे (Central Railway) आणि हार्बर रेल्वे (Harbor Railway) मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहेत. मध्य रेल्वेवर माटुंगा - ठाणे अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी 11.05 ते 3.35 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. तर, पनवेल- वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. 

माटुंगा - ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगाब्लॉक 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.09 या वेळेत सुटणाऱ्या डाउन धीम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर वळवण्यात येईल आणि शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांदरम्यान थांबतील. पुढे ठाणे स्थानकावर धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरानं पोहोचतील.  

कल्याण येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत अप धीम्या मार्गावरील सेवा ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शीव स्थानकावर थांबतील. पुढे माटुंगा स्थानकावर पुन्हा अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरानं पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/दादर येथून सुटणाऱ्या डाउन मेल/एक्स्प्रेस गाड्या विद्याविहार/ठाणे ते दिवा स्थानकांदरम्यान पाचव्या मार्गावर वळवण्यात येतील आणि दादर/छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे येणाऱ्या अप मेल/एक्सप्रेस गाड्या या ब्लॉकदरम्यान कल्याण आणि विक्रोळी स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गावर वळवण्यात येतील. 

डाऊन धिम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.53 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून 3.18 वाजता सुटेल. अप धिम्या मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल कल्याण येथून सकाळी 9.55  वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल दुपारी 3.24 वाजता सुटेल. सकाळी 11 ते 05 या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या/पोहोचणाऱ्या सर्व अप आणि डाउन लोकल नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटं उशिरानं पोहोचतील.

पनवेल- वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक 

पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे जाणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर येथे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील. पनवेलहून सकाळी 11 ते दुपारी 3.50 वाजेपर्यंत ठाण्याकडे जाणारी अप ट्रान्सहार्बर लाईन सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत पनवेलकडे जाणारी डाउन ट्रान्सहार्बर लाईन सेवा  बंद राहतील. 

डाऊन हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि 10.50 वाजता पनवेल येथे पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणारी पहिली लोकल दुपारी 3.16 वाजता असेल आणि पनवेल येथे सायंकाळी 4.36 वाजता पोहोचेल.

अप हार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेल येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी शेवटची लोकल सकाळी 10.17 वाजता  सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.36 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी पनवेल येथून सुटणारी पहिली लोकल सायंकाळी 4.10 वाजता असेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सायंकाळी 5.30 वाजता पोहोचेल. 

ट्रान्सहार्बरवरची शेवटची लोकल कधी? 

डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी पनवेलच्या दिशेने जाणारी शेवटची लोकल ठाणे येथून सकाळी 9.39 वाजता सुटेल आणि पनवेल येथे सकाळी 10.31 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर पनवेलच्या दिशेने जाणारी पहिली लोकल दुपारी 4 वाजता असेल आणि पनवेल येथे दुपारी 4.52 वाजता पोहोचेल. 

अप ट्रान्सहार्बर मार्गावर, ब्लॉकपूर्वी ठाणे येथे जाणारी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 10.41 वाजता सुटेल आणि ठाणे येथे सकाळी 11.33 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतर ठाण्याच्या दिशेने जाणारी पहिली लोकल पनवेल येथून 4.26 वाजता सुटेल आणि ठाणे येथे संध्याकाळी 5.20 वाजता पोहोचेल. 

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी भागावर विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर लाईन सेवा उपलब्ध असेल. ब्लॉक कालावधीत बेलापूर/नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट लाईन सेवा उपलब्ध असेल.

दरम्यान, मुंबई लोकल मार्गांवरील आजचा मेगाब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभाल आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहेत. प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहन रेल्वेकडून करण्यात आलं आहे. रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती, या कामांसाठी आज ट्रान्स हार्बरवर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sharad Pawar Shevgan Rally : निलेश लंकेंच्या प्रचारार्थ शरद पवारांची आज शेवगावमध्ये सभाEknath Shinde Meeting : कोल्हापूरसंदर्भात मुख्यमंत्र्यांची रात्री उशीरा बैठक, घाटगेंसोबत चर्चाSanjay Pandey : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यताUjjwal Nikam  Mumbadevi :  उज्जवल निकम मुंबा देवीच्या दर्शनाला : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : महाविकास आघाडीची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
'मविआ'ची युवा फळी आज कोल्हापुरात; आदित्य ठाकरे, रोहित पवार अन् रोहित पाटलांच्या सभांचा धडाका
T20 World Cup 2024: हार्दिक पांड्याची निवड झाल्यास....; अजित आगरकर अन् रोहित शर्माची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
हार्दिकची निवड झाल्यास....;आगरकर अन् रोहितची भेट होण्याची शक्यता, 15 जणांची नावं होणार निश्चित
Chhagan Bhujbal on NDA In Maharashtra : एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
एनडीएसाठी निवडणूक सोपी नाही, राज्यात उद्धव ठाकरे, शरद पवारांसाठी सहानुभूतीची लाट : छगन भुजबळ
IPL 2024 Jake Fraser-McGurk: माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक फ्रेझर-मॅकगर्क?
माकडामुळे वर्ल्ड कपमधून घ्यावी लागली होती माघार; नावावर आहे भीम पराक्रम, कोण आहे जेक मॅकगर्क?
IPL 2024 Jake Fraser-McGurk: बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
बुमराहचे दिवसभर व्हिडीओ बघत बसला, समोर येताच गगनचुंबी षटकार ठोकला, मॅकगर्क काय म्हणाला?
Sahil Khan: महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खान ताब्यात
महादेव बेटिंग ॲप प्रकरणात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, छत्तीसगढमधून अभिनेता साहिल खान ताब्यात
IPL 2024 DC vs MI: रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
रोहित शर्माने पतंग देताच ऋषभ पंत ती भर मैदानात उडवू लागला; पुढे काय घडलं?, पाहा मजेशीर Video
Eknath Shinde: मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याची हमी
मोदींच्या सभेनंतर एकनाथ शिंदे कोल्हापूरमध्येच थांबले, समरजितसिंह घाटगेंसोबत बंद खोलीत चर्चा, कागलमधून रेकॉर्डब्रेक मताधिक्याचा शब्द
Embed widget