एक्स्प्लोर
मुंबई-गोवा क्रूझ एप्रिलपासून, तिकीट दर...
बहुप्रतिक्षीत मुंबई-गोवा क्रूझ सेवा आता सुरु होण्याच्या मार्गावर आहे.
मुंबई: बहुप्रतिक्षीत मुंबई-गोवा क्रूझ सेवा आता सुरु होण्याच्या मार्गावर आहे. येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ही सेवा सुरु होईल, असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीसाठी गोव्याला जाणाऱ्यांना प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
महाराष्ट्र आणि गोवादरम्यान जलवाहतुकीला चालना देण्यासाठी मुंबई-गोवा क्रूझ सेवा सुरु करण्यात येणार आहे. या वर्षीच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीपासूनच ही सेवा सुरु होणार होती, मात्र ती अजूनही सुरु झाली नाही.
आता काही दिवसातच मुंबई-गोवा क्रूझ सेवा सुरु होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या प्रवासासाठी एकावेळचं तिकीट एक ते दीड हजार इतकं असेल.
सी ईगल ही कंपनी मुंबई-गोवा मार्गावर क्रूझ सेवा पुरवणार आहे. एक दिवसआड ही क्रूजसेवा असेल. या क्रूझमधून एकावेळी 200-250 प्रवासी प्रवास करु शकतात.
उन्हाळी सुट्टीच्या निमित्ताने अनेकजण मुंबईहून गोव्याला जातात. त्यांच्यासाठी रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाचा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता त्यांना समुद्रातून प्रवास करण्याचा पर्याय उपलब्ध झाला आहे.
मुंबई-गोवा क्रूझ सेवा
- एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून सुरु
- एक दिवसआड सेवा
- तिकीट 1 ते दीड हजार
- प्रवासी क्षमत - 200 ते 250
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
क्रिकेट
रायगड
Advertisement