Mumbai Fire : कांजूरमार्गच्या अपेक्स कंपाऊंडमध्ये अग्नितांडव, अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी
Mumbai Fire: कांजूरमार्गमधील डब्बावाला कंपाऊंडजवळ ही भीषण आग लागली आहे.
मुंबई : मुंबईच्या कांजूरमार्ग परिसरातील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. कांजूरमार्गमधील डब्बावाला कंपाऊंडजवळ ही भीषण आग लागली आहे. आगीच्या ठिकाणी सिलेंडर ब्लास्ट होत आहे. 20 ते 22 सिलेंडर ब्लास्ट झाला. सिलेंडर ब्लास्ट अजूनही सुरू आहे
एका कंपनीच्या सर्व्हिस सेंटरमधून या आगीला सुरुवात झाली अशी माहिती आहे. या ठिकाणी इलेक्ट्रॉनिकस वस्तू तसेच लाकडी सामान अशा अनेक वस्तूंचे गोदाम आहेत. डबावाला कंपाऊंडजवळ ही आग आहे. अग्निशमन दलाच्यावतीने आग विझवण्याचे काम करत असून सुरू असून 10 बंब 4 टँकरसह घटनास्थळी अग्निशमन दलाचे कर्मचारी पोहचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. आग लागताच या ठिकाणचे कर्मचारी बाहेर पडले आतापर्यंत जीवित हानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
शिवसेना नगरसेविका सुवर्णाताई करंजे म्हणाली, आग लागून दोन तास झाला आहे. आग अजून आटोक्यात आलेली आहे. आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅमसंगच्या गोडाऊन असल्यामुळे आग भडकत आहे. आजूबाजूच्या गोदामामध्ये सिलेंडर असल्यामुळे जोरात सिलेंडरचा स्फोट होत आहे. सध्या 12 ते 14 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल होऊन आग विझवण्याचा प्रयत्न करत आहे. सिलेंडर ब्लास्ट अजूनही सुरू असल्याने आग पुन्हा भडकली आहे.
Mumbai मधील हेवी इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग
संबंधित बातम्या :