एक्स्प्लोर

मुंबईत गोविंदाची मृत्यूशी झुंज अपयशी; 22 वर्षीय संदेश दळवीचा मृत्यू, आयोजकांवर गुन्हा दाखल; नेत्यांकडून मदतीचं आश्वासन

Mumbai Dahi Handi 2022 : मुंबईच्या विलेपार्ल्यात दहीहंडी खेळताना जखमी झालेला गोविंदा संदेश दळवीचा मृत्यू. आयोजकावर शनिवारीच गुन्हा दाखल, नेत्यांकडून मदतीचं आश्वासन.

Mumbai Dahi Handi 2022 : दोन दिवस मृत्यूशी झुंज देणाऱ्या गोविंदाचा (Govinda) अखेर मृत्यू झाला. संदेश दळवी (Sandesh Dalvi) असं या गोविंदाचं नाव आहे. मुंबईतील (Mumbai) नानावटी रुग्णालयात (Nanavati Hospital) संदेशनं अखेरचा श्वास घेतला. संदेश दळवी असं या गोविंदाचं नाव आहे. संदेश दळवी हा शिव शंभो गोविंदा पथकाचा (Shiv Shambho Govinda Pathak) गोविंदा होता. दहीहंडीला (Dahi Handi 2022) तो जखमी झाला होता. त्याला नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र आज त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जितेंद्र जानावळे यांनी दिलीये.

गेली दोन वर्ष कोरोना आणि लॉकडॉऊनमुळे अनेक सण-उत्सवांवर निर्बंध लादण्यात आले होते. अशातच यंदा मात्र सर्व सण-उत्सव धुमधडाक्यात आणि निर्बंधमुक्त साजरे करता येणार असल्याची घोषणा खुद्द मुख्यमंत्र्यांनीही केली. त्यानुसार, मोठ्या जल्लोषात दहीहंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक नेत्यांनी दहीहंडी उत्सवाचं आयोजन केलं होतं. या उत्सवादरम्यान, अनेक गोविंदा जखमी झाले. अनेकांना प्राथमिक उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला. तर काहींवर उपचार सुरु होते. त्यापैकीच एक अवघ्या 22 वर्षांचा गोविंदा संदेश दळवी. 

विलेपार्ले पूर्व बाबरवाडा विमानतळ येथे दहीहंडी फोडत असताना संदेश 7व्या थरावरुन खाली कोसळला. त्याला कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही. मुंबईतील कूपर रुग्णालयात दोन दिवस तो दाखल होता. 7व्या थरावरुन खाली कोसळल्यामुळे त्याच्या मानेला आणि मेंदूला जबर दुखापत झाली होती. अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. 

संदेश अवघ्या 22 वर्षांचा. घरामध्ये आई-वडील आणि आपल्या भावंडांसह तो राहत होता. संदेश सर्वात लहान. मुळचा पार्लेकर पण सध्या तो कुर्ल्यात राहत होता. घरात सर्वात लहान असल्यामुळे आई-वडिलांसह घरातील सर्वांचाच लाडका. संदेशच्या जाण्यानं दळवी कुटुंबीयांवर मोठी शोककळा पसरली आहे. 

दहिहंडीत डोक्याला मार लागून दोन गोविंदा गंभीर जखमी झाल्याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल झाला होता. विलेपार्ले पोलीस ठाण्यात हा गुन्हा आयोजांवर शनिवारी दाखल करण्यात आला होता. विलेपार्ले पूर्व येथे वाल्मिकी चौक येथे रियाज शेख यानं दहिहंडीचं आयोजन केलं होतं. मात्र गोविंदा पथकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं कोणतीही काळजी न घेता, कोणतीही साधनसामग्री पुरवली नाही. यावेळी विनय शशिकांत रांबाडे (वय 20 वर्ष) संदेश प्रकाश दळवी, वय 24 वर्षे हे दोघेजण दहीहंडी फोडत असताना खाली पडून त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 

पाहा व्हिडीओ : 22 वर्षीय संदेश दळवीचा मृत्यू, नानावटी रुग्णालयात गोविंदाने घेतला अखेरचा श्वास

10 लाख रुपयांची मदत देणार : गिरीश महाजन

मुंबईतील गोविंदाच्या मृत्यूबाबत बोलताना राज्याचे क्रीडामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, दहीहंडी फोडताना सातव्या थरावरुन मुलगा खाली कोसळला होता. त्याच्या मानेला आणि मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. रविवारी त्याला नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काल (सोमवारी) दुपारी त्याच निधन झाल्याची माहिती मिळत आहे. गोविंदाचं प्राण गमावणं ही दूर्दैवी घटना असल्याचंही यावेळी बोलताना ते म्हणाले. तसेच शासनानं जाहीर केल्याप्रमाणे त्याच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये देणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच, त्याच्या घरची परिस्थिती पाहून आणखी काही मदत करता येईल का? याबाबत देखील विचार करु, असंही त्यांनी स्पष्ट केलं. आयोजकांनी नियमावलीचं पालन केलं की, नाही याची देखील चौकशी करू, असंही गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलं आहे. 

गोविंदाच्या मृत्युचं कोणी राजकारण करू नये : प्रवीण दरेकर 

गोविंदाच्या मृत्यूचं कोणीही राजकारण करु नये. सरकार संवेदनशील आहे. गोविंदांना 10 लाखाचा विमा पहिल्यांदा देण्यात आला आहे. ही सर्व मदत सरकार देणार आहे. गोविंदाच्या मृत्यूचं भांडवल म्हणजे, मेलेल्याच्या टाळूवरील लोणी खाताय का?  ठाकरे साहेबांची शिवसेना हे चुकीचं करतेय, असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
Maharashtra Live News Updates: उच्च न्यायालयाने सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दल व्यक्त केली चिंता; सरकारला दररोज वैद्यकीय देखरेख ठेवण्याचे निर्देश
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sunil Tatkare On NCP Politics: आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे
आम्ही सुनेत्रा पवारांना सगळ्या गोष्टी सांगतो, आमच्या पक्षात कुठलाही गैरसमज नाही- सुनील तटकरे

व्हिडीओ

NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Sachin Ahir UNCUT Speech : वरळीकरांकडून जंगी सत्कार, ठाकरे पिता-पुत्रांवर टीका, सचिन अहिरांचं भाषण!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
मुंबई इंडियन्सचा नवा कॅप्टन जवळपास ठरला! इंग्लंडमधील बैठकीत शिक्कामोर्तब होणार, पण माहेला जयवर्धनेसह कोणाकोणाची एका झटक्यात उचलबांगडी होणार?
Gold Rate : गुड न्यूज, सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
सोने आणि चांदीच्या दरात घसरण कायम, 22 कॅरेट सोन्याचे दर 1 लाख 30 हजारांच्या खाली आले, जाणून लेटेस्ट दर
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयालाच सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
पतीकडून मारहाण, लेक माहेरला आली; मुलीला मारहाण करणाऱ्या जावयाला सासऱ्याने संपवलं; कुऱ्हाडीने मारलं
Solapur News : आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आमदार असो वा खासदार-मंत्री, प्रोटोकॉलनुसारच पांडुरंगाचे दर्शन मिळणार; व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास थेट गुन्हा दाखल होणार, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Virar News: विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
विरारच्या अर्नाळा समुद्रकिनारी चार अल्पवयीन मुलं बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, दोघांचा शोध सुरू
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सचिन अहिरांना 'रायगड' बंगला नाकारला, फ्लॅट दिला; मंत्री नसलेले रविंद्र चव्हाण दीड वर्षांपासून बंगल्यात
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
सुनेत्रावहिनी अन् पार्थ पवारांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न; अमोल मिटकरींचा दावा, मुख्यमंत्री भेटीनंतर वाद
Sonam Wangchuk: सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज तब्बल 19 वा दिवस; तब्बल 9 किलो वजन घटलं, थकलेला देह पाहून हळहळ, प्रकृती खालावल्याने जीव धोक्यात
Embed widget