Mumbai BEST bus: मुंबईतील 'बेस्ट'चे तिकीट दर दुप्पट होणार? साध्या बस आणि एसी बसचे भाडे किती रुपयांनी वाढणार?
Mumbai bus service: मुंबईकरांचा खिसा लवकरच खाली होणार आहे. बेस्ट बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जास्त पैसे मोजावे लागणार. तिकीट दुप्पट होण्याची शक्यता आहे.

मुंबई: बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाला होत असलेला तोटा, कर्मचाऱ्यांची देणी आणि मुंबई महापालिकेकडे सातत्याने करावी लागणारी आर्थिक मदतीची मागणी या पार्श्वभूमीवर तिकीट दर दुप्पट करण्याचा विचार केला जात आहे. त्यानुसार साध्या बसचे (BEST Bus) भाडे पाचवरून 10 रुपये व वातानुकूलित बसचे तिकीट सहावरून 12 रुपये प्रस्तावित आहेत.
बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे सीईओ एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी गुरुवारी बेस्ट अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन भाडेवाढीसह बस ताफा आणि सेवांचा आढावा घेतला. 'कर्मचाऱ्यांची देणी व तोटा यावर तोडगा काढण्यासाठी भाडेवाढीशिवाय पर्याय नाही. मात्र, याबाबत आणखी सविस्तर चर्चा करूनच निर्णय होईल. बेस्ट उपक्रम तोट्यात आहे. तपा कर्मचाऱ्यांची देणीही आहेत. यासह अन्य खर्चही आहेत. त्यामुळे भाडेवाढीचा पर्याय समोर आहे. मात्र याबाबत आताच सांगणे योग्य नाही , अशी प्रतिक्रिया एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच मुंबईत रिक्षा आणि टॅक्सीच्या मीटरचे दर वाढवण्यात आले होते. 1 फेब्रुवारीपासून मुंबई महानगर प्रदेशातील मीटर ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी वाढ झाली होती. तर कूल कॅबच्या दरात 8 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. या नवीन दरांनुसार, मुंबईत ऑटो रिक्षाचे किमान भाडे 23 रुपयांवरून 26 रुपये करण्यात आले आहे, तर टॅक्सीचे किमान भाडे ₹28 वरून ₹31 करण्यात आले आहे. तसेच, कूल कॅबच्या भाड्यात वाढ होऊन ₹40 ऐवजी ₹48 आकारले जाणार आहेत.
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी
पुण्यातील पीएमपीएल'च्या ताफ्यातील बसची संख्या वाढवण्यात येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी मिळणार एक हजार बस. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडुन 500 बस विकत घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही शहरांमधील प्रवाशांची संख्या लक्षात घेता, 6000 बसची गरज आहे. प्रत्यक्षात रस्त्यावर 1650 बस धावतात. आयुर्मान संपल्यामुळे 300 बस कमी होणार आहे. त्यामुळे बस खरेदीच्या मान्यतेमुळे पीएमपीएलला उर्जितावस्था येण्याची शक्यता आहे. बस खरेदीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मान्यताही दिली आहे.
पुण्यात मेट्रोच्या बांधकाम साहित्याची चोरी
शिवाजीनगर भागात सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेचे 2 लाख 60 हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रितेश प्रधान यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी प्रधान हे मेट्रो कंपनीत सिक्युरिटी सुपरवाइजर म्हणून काम करतात. मेट्रोच्या कामावरून साहित्यांची चोरी मागील काही वर्षांपासून चोरी होत असल्याचे समोर आले आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
