एक्स्प्लोर
Advertisement
डेडलाईन हुकल्या, मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग का नको? : आदित्य ठाकरे
तावडेंच्या कारभारापेक्षा आधीचं सरकार बरं होतं. शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हरॅसमेंटची केस दाखल करायला हवी, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाची डेडलाईन पाळण्यात मुख्यमंत्री अपयशी ठरले आहेत, तेव्हा त्यांच्यावर हक्कभंग का आणू नये असा सवाल युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत शिवसेना भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरेंनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंवरही जोरदार टीका केली.
तावडेंच्या कारभारापेक्षा आधीचं सरकार बरं होतं. शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हरॅसमेंटची केस दाखल करायला हवी, असं आदित्य ठाकरे म्हणाले. विद्यापीठासोबत MOU झाला होता का, हे प्रश्न अनुत्तरित आहेत. यात आम्हाला पारदर्शकता हवी आहे, अशी मागणीही आदित्य ठाकरेंनी केली.
आदित्य ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतले इतर मुद्दे :
मुख्यमंत्र्यांनी सभागृहात एक डेडलाईन दिली होती ती उलटली. मग आता मुख्यमंत्र्यांवर हक्कभंग आणायचा का?
जर मुंबईबाहेर पडल्यावर मोबाईल नेटवर्क मिळत नसेल, तर शेतकरी कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज कसे भरतील?
सिनेटची निवडणूक लांबली, त्यामागे काय कारणं आहेत, हे कळलं पाहिजे
कुलगुरुंना काढून प्रश्न सुटणार नाहीत, तर शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा
विद्यापीठात IAS / IPS अधिकारी नेमावा ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली
शिक्षणमंत्र्यांवर मेंटल हरॅसमेंटची केस दाखल केली पाहिजे, या विषयावर मी पंतप्रधानांची वेळ मगितली आहे.
राज्यमंत्र्यांना किती अधिकार असतो, हे पाहिलं पाहिजे. या खात्यात आम्हाला कॅबिनेट पदाचा दर्जा द्यावा, मग दाखवू कसं काम होतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
लातूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement