एक्स्प्लोर
वडाळा ते लोअर परेल लवकरच मोनो धावणार, चाचणी यशस्वी

मुंबईः लालबागची राणी अर्थात वडाळा ते लोअर परेल दरम्यान सुरु होणारी मोनो लवकरच धावताना दिसणार आहे. वडाळा डेपो ते लोअर परेल दरम्यान मोनोची 9 किमीची यशस्वी चाचणी घेण्यात आली. ताशी 15 किमी प्रतितास वेगाने ही चाचणी घेण्यात आली. मोनोचे अंतीम स्थानक संत गाडगे महाराज स्थानक हे लोअर परेल स्टेशनपासून 1200 मीटर अंतरावर आहे. त्यामुळे लोकल स्टेशनला लागूनच लोअर परेल स्टेशनही असणार आहे.
वडाळा डेपो, जीटीबी नगर, अँन्टॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परेल या स्थानकांदरम्यान ही चाचणी घेण्यात आली. मुंबईकरांना आता मोनोच्या प्रवासाची उत्सुकता लागली आहे.
वडाळा डेपो, जीटीबी नगर, अँन्टॉप हिल, आचार्य अत्रे नगर, वडाळा ब्रिज, दादर पूर्व, नायगाव, आंबेडकर नगर, मिंट कॉलनी, लोअर परेल या स्थानकांदरम्यान ही चाचणी घेण्यात आली. मुंबईकरांना आता मोनोच्या प्रवासाची उत्सुकता लागली आहे. आणखी वाचा























