कामगाराच्या खिशातच मोबाईलचा स्फोट, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद
अब्दुल रौफ हा कामगार इतर कामगारांसोबत 28 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेदरम्यान बसला होता. मात्र अचानक त्याच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईलने पेट घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्वरित हा मोबाईल खिशातून काढून जमिनीवर फेकला. अब्दुलच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही.
![कामगाराच्या खिशातच मोबाईलचा स्फोट, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद Mobile blast in company workers pocket in mumbai कामगाराच्या खिशातच मोबाईलचा स्फोट, धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीत कैद](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2019/03/02231408/blast-new.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : खिशात ठेवलेल्या मोबाईलचा स्फोट झाल्याचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. मुंबईच्या साकिनाका खैराणी रोड येथील रॉयल फेब्रिकेशन या कारखान्यात काम करणाऱ्या एका कामगाराच्या मोबाईलचा स्फोट झाला आहे. ही संपूर्ण घटना कारखान्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
अब्दुल रौफ हा कामगार इतर कामगारांसोबत 28 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजेदरम्यान कारखान्यात बसला होता. मात्र अचानक त्याच्या पॅन्टच्या खिशातील मोबाईलने पेट घेतल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने त्वरित हा मोबाईल खिशातून काढून जमिनीवर फेकला. अब्दुलच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने त्याला गंभीर दुखापत झाली नाही.
मोटोरोला कंपनीचा हा मोबाईल असल्याचं समोर आलं आहे. मोबाईल स्फोटाच्या या घटनेमुळे मोबाईल वापरणाऱ्यांनी योग्य काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
व्हिडीओ-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)