एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
खड्ड्यांप्रकरणी मनसे आक्रमक, तुर्भेतलं PWD चं ऑफिस फोडलं!
माझ्या मनसैनिकांनी केलेलं आंदोलन योग्य आहे. जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर किमान आंदोलन तरी दिसेल, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे.
नवी मुंबई : सायन-पनवेल महामार्गाची रस्त्यांमुळे अक्षरश: चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावर सकाळपासून मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते आहे. त्यामुळे आता मनसेनं तुर्भे इथल्या पीडब्लूडी कार्यालयाची तोडफोड केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या तोडफोडीचं समर्थन केले आहे.
पनवेलपासून सायनपर्यंत रस्त्यावर भले मोठे खड़्डे पडले आहेत. याचा परिणाम वाहनांचा वेग मंदावण्यात होतो आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळं खड्ड्यांच्या प्रमाणात वाढच झाली आहे. वाहनचालकांना त्यामुळं मोठी करसत करावी लागते आहे. खारघर आणि बेलापूर दरम्यानच्या दोन्ही मार्गिकांवर वाहतूक कोंडी झाली आहे. 4 ते 5 किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खारघर, सीवूड्स, नेरुळमधल्या अंतर्गत मार्गावरचे रस्तेही जाम झाले आहेत.
राज ठाकरेंचा पाठिंबा
माझ्या मनसैनिकांनी केलेलं आंदोलन योग्य आहे. जर सरकारला खड्डे दिसत नसतील, तर किमान आंदोलन तरी दिसेल, अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एबीपी माझाला दिली आहे.
राज ठाकरेंनी तुर्भेतील पीडब्लूडीच्या कार्यालयाच्या तोडफोडीचं समर्थन केले आहे. त्यामुळे येत्या काळात मनसैनिक खड्डेविरोधी आंदोलन अधिक आक्रमकपणे करण्याची शक्यता वाढली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement