एक्स्प्लोर
Advertisement
‘कृष्णकुंज’बाहेर मनसे कार्यकर्त्यांची उद्धव ठाकरेंविरोधात घोषणाबाजी
राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ बाहेर मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आहे.
मुंबई : मनसेचे सहा नगरसेवक फोडून शिवसेनेनं एकाच वेळी भाजप आणि मनसेला जबरदस्त धक्का दिला. त्यामुळे मनसैनिक मात्र चांगलेच संतापले आहेत. कालच्या संपूर्ण प्रकारानंतर आता मनसे कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरेंविरुद्ध घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आहे.
राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘कृष्णकुंज’ बाहेर मनसे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली असून त्यांनी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेविरोधात घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, फोडाफोडीमुळे संतप्त झालेल्या मनसे कार्यकर्त्यांचा रोष पाहता कुठलीही अघटित घटना घडू नये, म्हणून दिलीप लांडे, दत्ताराम नरवणकर, परमेश्वर कदम, डॉ.अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर आणि हर्षला मोरे यांच्या घरांना पोलीस संरक्षण देण्यात आलं आहे.
अजूनही कोकण आयुक्तांसमोर नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाली नसल्यानं या सर्वांना अज्ञात स्थळी ठेवण्यात आलं आहे. हे सहाही नगरसेवक आपल्या घरी नसल्याचं समजतं आहे.
शिवसेनेनं 7 पैकी 6 नगरसेवक फोडल्यानं मनसेवर महापालिकेतील पक्ष कार्यालयसुद्धा गमावण्याची वेळ येऊ शकते. शिवाय राज ठाकरे यांची अवस्था आता फक्त एक आमदार, एक नगरसेवक आणि एक पक्ष अशी झाल्याची चर्चा आहे.
दरम्यान, कालच्या धक्क्यातून मनसे आता थोडीफार सावरली असून त्यांनी नवी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे.
संबंधित बातम्या :
मनसेवर पालिकेतील पक्ष कार्यालय सोडण्याची वेळ
पूर्वाश्रमीचे शिवसैनिक पुन्हा शिवसेनेत : अनिल परब
7 नगरसेवक, 13 आमदार ते मनसेकडे उरलेला एकटा नगरसेवक
पहिल्या मास्टरस्ट्रोकनंतर शिवसेनेची तात्काळ दुसरी खेळी!
शिवसेनेचा मास्टरस्ट्रोक, मनसेचे सहा नगरसेवक सेनेसोबत
मनसेची साथ न सोडणारा एकमेव नगरसेवक कोण?
मॉकड्रीलचं कारण देत मुंबई महापालिकेच सर्व दरवाजे बंद!
करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप
दगाफटका योग्य नाही, नगरसेवकांवर राज ठाकरे भडकले
‘लवकरच मुंबईत आमचा महापौर’, सोमय्यांचं शिवसेनेला आव्हान मोठे दावे करणार्यांचे पोट फाडून भाजपचा विजय : आशिष शेलार भांडुप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, सत्ता समीकरणं कशी बदलणार? मुंबई वॉर्ड क्रमांक 116 पोटनिवडणूक : भाजपच्या जागृती पाटील विजयी करोडो देऊन शिवसेनेकडून नगरसेवकांची खरेदी, सोमय्यांचा गंभीर आरोप शिवसेनेला पश्चाताप, जागृती पाटील सेनेत येणार होत्या! फोडाफोडी आणि थैलीशाहीचे राजकारण नेहमीच यशस्वी होत नाही: शिवसेनाअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
क्राईम
निवडणूक
निवडणूक
Advertisement