शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली : अमेय खोपकर
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने शॅडो कॅबिनेटची घेषणा केली. परंतु शिवसेनेचं मुखपत्र सामनातून शॅडो कॅबिनेटची खिल्ली उडवण्यात आली. मंत्रिमंडळास शपथ देण्यासाठी शॅडो राज्यपाल नेमण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. परंतु यावर आता मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी उत्तर दिलं आहे.
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेने शॅडो कॅबिनेट म्हणजेच प्रतिरुप मंत्रिमंडळाची घेषणा केली. मनसेच्या या शॅडो कॅबिनेटवर शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'तून खिल्ली उडवण्यात आली. मात्र या टीकेला आता मनसेही उत्तर दिलं आहे. शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली, अशा शब्दात मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीटद्वारे शिवसेनेला उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या चौदाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. मनसेच्या या शॅडो कॅबिनेटवर 'सामना'च्या अग्रलेखातून जोरदार टीका करण्यात आली. 'शॅडो वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच' अशा शब्दात 'सामना'तून मनसेच्या शॅडो कॅबिनेटची खिल्ली उडवण्यात आली आहे. शिवाय, शॅडो मुख्यमंत्री आणि शॅडो राज्यपालांची नेमणूकही व्हायला हवी होती, असा टोलाही 'सामना'तून लगावला आहे.
'शॅडो'वाल्यांचे मुख्यमंत्रीपद रिकामेच, सामनातून मनसेच्या शॅडो कॅबिनेटची खिल्ली
मात्र यानंतर मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून शिवसेनेला विशेषत: खासदार संजय राऊत यांना उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं आहे की, "शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख 'सावली'वर खर्च केल्याबद्दल 'शॅडो' संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात 'मोठी तिची सावली' हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा."
शॅडो कॅबिनेटच्या नुसत्या घोषणेने रडत राऊतची तंतरली. अख्खा अग्रलेख ‘सावली’वर खर्च केल्याबद्दल ‘शॅडो’ संपादकांचे आभार. हा खेळ सावल्यांचा आत्ता कुठे सुरु झालाय. पिक्चर तो अभी बाकी है, भविष्यात ‘मोठी तिची सावली’ हा अग्रलेख लिहायला लागू नये असं काम महाखिचडीने करावं या सदिच्छा
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) March 11, 2020
मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर; आदित्य ठाकरेंच्या खात्यावर अमित ठाकरे नजर ठेवणार
अग्रलेखात काय म्हटलंय?
महाराष्ट्रातील घडामोडींमुळे देशातील राजकारणाला नवे वळण लागले आहे. त्यामुळे सगळ्यात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष हा एका रात्रीत विरोधी पक्षाच्या बाकावर जाऊन बसला. भाजप विरोधी पक्ष झाला तरी अद्याप सत्ताधारी असल्याच्या तोऱ्यात वागत आहे. हे जरा गमतीचे वाटते.
संसदीय लोकशाहीत प्रबळ विरोधी पक्षाचे स्थान हे सत्ताधाऱ्यांच्या तोडीस तोड असते, पण विरोधी पक्षाच्या नेत्याचे स्थान आणि कार्य नेमके काय असते याबाबत आपल्याकडील राजकारण्यांचे अज्ञान आहे. त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावर, राज्यस्तरांवरील विरोधी पक्ष 'फुटकळ' प्रयोग करीत असतो. अशा प्रयोगाने विरोधकांची प्रतिष्ठा कमी होते. इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, न्यूझीलंड अशा देशांतील संसदीय लोकशाहीत पंतप्रधानांइतकेच विरोधी पक्षाच्या नेत्यांचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
संसदीय लोकशाहीचा तो अविभाज्य भाग आहे. किंबहुना त्याचे वर्णन 'पर्यायी पंतप्रधान' (प्रिटेंडर टू डू प्राइम मिनिस्टर्स थ्रोन) असेच केले जाते. लोकशाही व विरोधी पक्षाच्या बाबतीत हे घडाभर तेल ओतायचे कारण असे की, महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळावर 'नजर' ठेवण्यासाठी एक 'शॅडो कॅबिनेट' एकमेव आमदार असलेल्या पक्षाने जाहीर केले आहे. हे 'शॅडो' मंत्रिमंडळ राज्यातील लोकनियुक्त मंत्रिमंडळाचे काय व कसे चालले आहे यावर म्हणे लक्ष ठेवील. सरकारच्या चुकीच्या कामकाजाचे वाभाडे काढण्यासाठी हे 'शॅडो कॅबिनेट' बनवले आहे असे संबंधित राजकीय पक्षातर्फे जाहीर केले आहे.
Shadow Cabinet | आदित्य, उद्धव ठाकरेंसह 'या' मंत्र्यांच्या खात्यांवर अमित ठाकरेंची करडी नजर
सरकारच्या चुका दाखवाच, पण सरकारकडून एखादे चांगले काम झाले असल्यास त्यांचे अभिनंदन करावे असेही सांगण्यात आले. मुळात अशा प्रकारचे 'शॅडो कॅबिनेट' कोणी तयार करावे? याबाबत काही संकेत आहेत. हा प्रयोग संसदेतील प्रमुख आणि प्रबळ विरोधी पक्षाने करायचा असतो. महाराष्ट्र हे मोठे राज्य आहे व तिथे भाजप हा एक प्रबळ विरोधी पक्ष आहे. त्या 105 आमदारवाल्या पक्षाने 'शॅडो' मंत्रिमंडळ वगैरे बनवले नाही, पण एकमेव आमदारवाल्यांनी 'शॅडो' की काय ते बनवले.
जनाची नाही तर मनाची ठेवा, मनसेचा शिवसेनेला टोला