एक्स्प्लोर

Shadow Cabinet | आदित्य, उद्धव ठाकरेंसह 'या' मंत्र्यांच्या खात्यांवर अमित ठाकरेंची करडी नजर

मनसेचा चौदावा वर्धापन दिन सोहळ्याचा कार्यक्रम नवी मुंबईत पार पडला. ठाकरे सरकारच्या कारभारावर वचक ठेवण्यासाठी मनसेच्या शॅडो कॅबिनेटची घोषणा करण्यात आली. मनसे नेते अमित ठाकरे यांना उद्धव ठाकरे आणि चुलत भाऊ आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्याच्या कारभारावर नजर ठेवण्याची जबाबदारी मिळाली आहे.

नवी मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आज चौदावा वर्धापन दिन आहे. या निमित्ताने नवी मुंबईच्या वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृहात कार्यक्रम पार पडला. यात बहुप्रतीक्षित शॅड कॅबिनेट अर्थात प्रतिरुप मंत्रिमंडळाची आज घोषणा करण्यात आली. या आजच्या शॅडो कॅबिनेटमधली आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अमित ठाकरेंची खाती. मनसे नेते अमित ठाकरे यांना काका उद्धव ठाकरे आणि चुलत भाऊ आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्याच्या कारभारावर नजर ठेवण्याची जबाबदारी मिळाली आहे. याशिवाय माहिती व तंत्रज्ञान, ग्रामविकास, नगरविकास, मदत पुनर्वसन, वने या खात्यांवरही त्यांची नजर असेल. अमित ठाकरे यांची केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या खात्यावरच नजर ठेवणार नाहीत, तर हसन मुश्रीफ, एकनाथ शिंदे, संजय राठोड यांच्याही खात्यांवर करडी नजर ठेवतील. Shadow Cabinet | शॅडो कॅबिनेट म्हणजे काय? कोणत्या खात्यांवर अमित ठाकरेंची नजर? खातं                                 मंत्री ग्रामविकास                  हसन मुश्रीफ नगरविकास                 एकनाथ शिंदे मराठी भाषा                आदित्य ठाकरे पर्यटन                        आदित्य ठाकरे माहिती व तंत्रज्ञान        उद्धव ठाकरे मदत पुनर्वसन, वने     संजय राठोड वाभाडे काढाच पण कौतुकही करा : राज ठाकरे राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी मनसेचं हे शॅडो कॅबिनेट आहे. ठाकरे सरकारच्या कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी खातेनिहाय मनसे नेत्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक नेत्याकडे मिळालेल्या संबंधित खात्यातील कारभार आणि त्रुटी शोधून सरकारला जाब विचारण्याचं काम असेल. दरम्यान "महाराष्ट्रातील विविध प्रश्नांसाठी आणि समाजगटांसाठी काम करणारं हे खातं आहे. सरकारचं वाभाडे जिथे काढायचे आहेत तिथे वाभाडे काढा आणि जिथे सरकार चांगलं काम करेल तिथं त्यांचं अभिनंदन पण करु," असं राज ठाकरे शॅडो कॅबिनेटची घोषणा झाल्यानंतर म्हणाले. मनसेचं शॅडो कॅबिनेट जाहीर; आदित्य ठाकरेंच्या खात्यावर अमित ठाकरे नजर ठेवणार मनसेचं प्रतिरुप कॅबिनेट गृह, विधी-न्याय : बाळा नांदगावकर, किशोर शिंदे, संजय नाईक, राजू उमरकर, प्रविण कदम, मराठी भाषा, माहिती तंत्रज्ञान : अनिल शिदोरे, अमित ठाकरे, अजिंक्य चोपडे वित्त आणि गृहनिर्माण : नितीन सरदेसाई, मिलिंद प्रधान, अनिल शिदोरे महसूल आणि परिवहन : अविनाश अभ्यंकर, दिलीप कदम, कुणाल माईनकर ऊर्जा : शिरिष सावंत, मंदार हळबे, विनय भोईल ग्रामविकास : जयप्रकाश बाविसकर, अमित ठाकरे मदत पुनर्वसन, वने : संजय चित्रे, अमित ठाकरे, वागिश सारस्वत, संतोष धुरी शिक्षण : अभिजीत पानसे, आदित्य शिरोडकर, सुधाकर तांबोळी, चेतन पेडणेकर, अमोल रोग्ये कामगार : राजेंद्र वागस्कर, गजानन राणे नगरविकास, पर्यटन : संदीप देशपांडे, अमित ठाकरे, पृथ्वीराज येरुरकर सहकार पणन : दिलीप धोत्रे, कौस्तुभ लिमये अन्न व नागरीपुरवठा : राजा चौघुले, महेश जाधव मत्स्यविकास : परशुराम उपरकर महिला व बालविकास : शालिनी ठाकरे सार्वजनिक बांधकाम (उपक्रम सोडून) : अभिजीत सप्रे सार्वजिन उपक्रम : संजय शिरोडकर सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण : रिटा गुप्ता सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार : अमेय खोपकर कौशल्य विकास : स्नेहल जाधव

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
राज्यात दुष्काळी परिस्थिती, बळीराजासाठी IAS आणि  IPS अधिकाऱ्यांचा पुढाकार, एक दिवसाचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीला
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pratapgad Fort : छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा जागर, किल्ले प्रतापगड 367 मशालींच्या प्रकाशानं उजळला, पाहा फोटो
Raigad Crime Controversy : रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादी वाद पुन्हा पेटला, सेनेच्या आमदाराकडून जिल्हा परिषद सदस्याला ठार मारण्याची धमकी, तक्रार दाखल
Team India Squad: बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
बीसीसीआयची मोठी खेळी, न्यूझीलंड विरोधातील वनडे मालिकेसाठी 2 कॅप्टन निवडले, श्रेयस अय्यरचं प्रमोशन 
YCM Hospital : कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन; विभागीय चौकशीचे आदेश
कर्तव्यावर असताना पार्टी करणं भोवलं, मद्यधुंद अवस्थेत आढळलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव म्हस्के यांचे निलंबन
CJP Tiranga March: सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भारताविरोधात मोठा कट,बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
सीजेपीच्या लहरा दो तिरंगा मार्च मागे एलॉन मस्क यांचा हात, भाजपच्या बृजभूषण शरण सिंह यांचा मोठा आरोप
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
मोठी बातमी! MPSC परीक्षा पेपरफुटी प्रकरण, चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली आयोगाची स्थापना
Sanjay Raut: सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्यावरील टिप्पणी प्रकरणी संजय राऊतांना सुप्रीम कोर्टाची नोटीस; नेमकं प्रकरण आहे तरी काय?
MPSC New Chairman : मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, विवेक भीमनवार रजेवर जाताच निर्णय
मोठी बातमी, MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सतीश वाघोले यांच्याकडे, भीमनवार रजेवर जाताच निर्णय
Embed widget