Mumbai Local Mega Block : हार्बर-मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांना दिलासा
Mumbai Local Mega Block News : मुंबईकरांसाठी (Mumbai) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत उद्या (रविवार, 14 ऑगस्ट) तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) आहे.
Mumbai Local Mega Block News : मुंबईकरांसाठी (Mumbai) अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत उद्या (रविवार, 14 ऑगस्ट) तीनही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक (Mumbai Local Mega Block) आहे. त्यामुळे उद्या वीकेंडला मुंबईत लोकलनं (Mumbai Local) प्रवास करणार असाल तर रेल्वेचं बदललेलं वेळापत्रक जाणूनच प्रवास करा. पश्चिम रेल्वेनं प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा आहे. कारण पश्चिम रेल्वेवर दिवसा मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
14 ऑगस्ट रोजी घेण्यात येणारा मेगाब्लॉक हा उपनगरी रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती, तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामे करण्यासाठी घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल ते माहीम अप आणि डाऊन जलद मार्गावर रात्रकालीन जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे.
Mega Block on 14.08.2022 https://t.co/j8tYVfLHnz
— Central Railway (@Central_Railway) August 13, 2022
मध्य रेल्वे
कुठे - सीएसएमटी ते विद्याविहार, अप डाऊन धीमा मार्ग
कधी - सकाळी 10.55 ते दुपारी 3. 58
परिणाम- ब्लॉकदरम्यान सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धीम्या लोकल सीएसएमटी ते विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे धिम्या डाऊन मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धिम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटीदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकात थांबतील.
हार्बर रेल्वे
कुठे - कुर्ला ते वाशी, अप-डाऊन मार्ग
कधी - सकाळी 11.10 ते दुपारी 4.10
परिणाम- ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-पनवेल/बेलापूर-सीएसएमटी आणि सीएसएमटी-वाशी अप-डाऊन मार्गावरील लोकल रद्द असणार आहेत. प्रवाशांच्या सुविधेसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल-वाशी दरम्यान विशेष लोकल चालविण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे
कुठे - मुंबई सेंट्रल ते माहीम, अप-डाऊन जलद मार्ग
कधी- शनिवार रात्री 12 ते पहाटे 4
परिणाम - ब्लॉकदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावरील लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझ रेल्वे स्थानकांदरम्यान अप-डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येतील. ब्लॉक कालावधीत डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द राहणार आहेत. रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर कोणताही मेगाब्लॉक राहणार नाही.