एक्स्प्लोर
23 एप्रिल रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
मुंबई : मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकल ट्रेनच्या रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवार 23 एप्रिल रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड स्टेशनदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11.30 ते दुपारी 4.30 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. यादरम्यान, माटुंगा ते मुलुंड मार्गावरील डाऊन धीमी वाहतूक डाऊन जलद मार्गावर चालवली जाईल. त्यामुळे लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग, नाहूर या स्टेशनवर थांबणार नाहीत.
तर सीएसटीहुन डाउन जलद मार्गावर सुटणार्या सर्व लोकल गाड्या सकाळी 10.48 ते दुपारी 2.42 वाजेपर्यंत घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्टेशनवर थांबतील. तसंच सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सीएसटी जाणाऱ्या सर्व अप आणि डाऊन लोकल उशिराने धावतील.
याशिवाय हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि माहिम स्टेशनदम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गावर दुरुस्तीचं काम हाती घेण्यात आलं आहे. त्यामुळे सकाळी 11.10 ते दुपारी 4.40 वाजेपर्यंत सीएसटी ते चुनाभट्टी दरम्यानची अप आणि डाऊनवरील वाहतूक पुर्णपणे बंद राहील.
तसंच सीएसटी ते वाशी, बेलापूर, पनवेल दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी 11.21 ते दुपारी 4.43 वाजेपर्यत बंद राहणार आहे. तर सीएसटी ते कुर्ला आणि सीएसटी ते वांद्रे या दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असेल.
हार्बर मार्गावरील प्रवाशांसाठी कुर्ला स्टेशनवरील प्लॅटफार्म क्र. 8 वरुन पनवेलसाठी विशेष लोकल चालवण्यात येणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement