एक्स्प्लोर

मुख्यमंत्री-गटनेत्यांच्या बैठकीत घटनात्मक पेच, तोडगा नाहीच

तर सरकार लावत असलेला नियम मराठा आरक्षणाला लागू होत नाही. त्यामुळे अहवाल मांडण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत.

मुंबई : मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गटनेत्यांच्या बैठकीत घटनात्मक पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे कोणत्याही तोडग्याविनाच ही बैठक संपली. आम्ही मराठा समाजाला आरक्षण देण्यावर ठाम आहोत, पण मागासवर्ग आयोगाच्या अहवालाऐवजी आरक्षणाचा एटीआर अर्थात कृती अहवाल मांडणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. तर सरकार लावत असलेला नियम मराठा आरक्षणाला लागू होत नाही. त्यामुळे अहवाल मांडण्याच्या मागणीवर विरोधक ठाम आहेत. विधीमंडळात आज मुख्यमंत्री आणि गटनेत्यांची बैठक झाली. या बैठकीला विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषदेचे सभापती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सहकार मंत्री सुभाष देशमुख उपस्थित होते. तर शिवसेनेने दिवाकर रावते, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार, जयंत पाटील, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, काँग्रेसचे राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, शेकापचे जयंत पाटील आणि विनायक मेटे उपस्थित होते. मुख्यमंत्री काय म्हणाले? या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाचा एटीआर मांडणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, "कलम 9 आणि 11 अन्वये वार्षिक अहवाल किंवा लेखापरीक्षा यावर आयोगाने दिलेला सल्ला किंवा शिफारशी स्वीकृत किंवा अस्वीकृत केली, किंवा त्यावर केलेली कार्यवाही सभागृहात मांडण्याची व्यवस्था करावी, अशी तरतूद आहे. शिवाय मराठा आरक्षणाबाबत राणे समितीने अहवाल नाही तर एटीआर मांडला." मागास आयोगावर सरकारची भूमिका "आतापर्यंत मागास आयोगाचे 52 अहवाल आले, त्यापैकी 4 अहवाल फेटाळले. आघाडी सरकारने एकही अहवाल सभागृहात मांडला नाही. 47 अहवाल स्वीकारले, लागूही केले पण सभागृहात मांडले नाही. शिवाय आतापर्यंत अहवालावर एकही एटीआर आणला नाही," अशी भूमिका सरकारने गटनेत्यांच्या बैठकीत मांडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मुख्यमंत्री-गटनेत्यांच्या बैठकीत घटनात्मक पेच, तोडगा नाहीच मुख्यमंत्री-गटनेत्यांच्या बैठकीत घटनात्मक पेच, तोडगा नाहीच (घटनेतील या नियमांच्या तरतुदींवर सरकार आणि विरोधकांमध्ये खल सुरु) अहवालावर विरोधक ठाम परंतु मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर विरोधकांनी नाराजी दर्शवली. "मराठा आरक्षणाचा अहवाल हा वार्षिक अहवाल किंवा लेखापरीक्षा नसून जादा अहवाल आहे. सरकार सांगत असलेला नियम मराठा आरक्षणाला लागू होत नाही. मागील सरकारमध्ये राणे समितीने अहवाल दिला होता. मात्र या सरकारने आयोग स्थापन करुन अहवाल मागितला. त्यामुळे समितीचा अहवाल सभागृहात मांडणं बंधनकारक नसलं तरी आयोगाचा अहवाल पटलावर ठेवला पाहिजे," अशी मागणी विरोधकांनी केली. संबंधित बातम्या मराठा आरक्षण 5 डिसेंबरला लागू होणार : सूत्र आरक्षणाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी सरकार मराठा आरक्षणाच्या अहवालावर एटीआर मांडणार मुख्यमंत्री का घाबरत आहेत? : जयंत पाटील 29 नोव्हेंबरला मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Hello Mic Testing ABP Majha : हॅलो माईक टेस्टिंगमध्ये नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप आणि नेत्यांची भाषणंSankarshan Karhale Politics Poem : संकर्षण कऱ्हाडेंची महाराष्ट्राच्या राजकारणावरील कविता व्हायरलDevendra Fadnavis:निर्यातबंदीतही सरकारकडून कांदा खरेदी, विरोधकांना शेतकऱ्यांशी देणंघेणं नाही:फडणवीसRavikant Tupkar On BJP : कांदा निर्यातीची निर्णय हा व्यापाऱ्यांसाठी, तुपकरांची केंद्र सरकारवर टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
राजस्थानचा हल्लाबोल! यंदाच्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
संजू सॅमसन-ध्रुव जुरेलची रॉयल खेळी, राजस्थाननं लखनौला सात विकेटनं लोळवलं!
Baipan Bhaari Deva : महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट 'बाईपण भारी देवा'चा होणार वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअर; जाणून घ्या कुठे पाहायला मिळणार...
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
हार्दिक पांड्याची कार्बन कॉपी, लग्नात वाजवतोय ढोल, पाहा व्हायरल व्हिडीओ
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
मोठी बातमी : उद्धव ठाकरेंना मोठा झटका! एम के मढवी यांना अटक
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या; फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
Embed widget