Measles Disease : राज्यात गोवर रुग्णांची संख्या आठशेच्या वर; उद्या गोवर राज्य टास्क फोर्सची महत्वाची बैठक
Measles Disease : मागील चार वर्षांची राज्याची गोवरची परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजेच 2022 या वर्षातील गोवरची परिस्थिती फारच चिंताजनक झाली आहे.

Measles Disease : राज्यात गोवरची (Measles Disease) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. शहरात तर गोवर संसर्ग पोहोचलाच आहे मात्र, आता गावामध्येही गोवर संसर्ग झालेले रूग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे राज्यात चिंता वाढू लागली आहे. आज गोवरचा उद्रेक 96 पटींनी वाढला आहे. तर, 12 हजार 841 संशयित रूग्ण आढळले आहे. गोवरची वाढती रूग्णसंख्या पाहून उद्या गोवर राज्य टास्क फोर्सची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.
राज्यातील गोवरची स्थिती काय आहे?
मागील चार वर्षांची राज्याची गोवरची परिस्थिती पाहता यावर्षी म्हणजेच 2022 या वर्षातील गोवरची परिस्थिती फारच चिंताजनक झाली आहे. 2019 मध्ये गोवरचा उद्रेक तीन पटींनी झाला होता. तर, 2020 मध्ये गोवरचा उद्रेक दोन पटींवर होता. 2021 मध्ये तर गोवर बाधित रूग्णांची संख्या आतापर्यंतची सर्वात कमी म्हणजेच एक पटींनी वाढली होती. 2022 मध्ये गोवर आजाराने कहरच केला आहे. ही संख्या आता 96 पटींनी वाढली आहे.
आजची गोवरबाधित रूग्णांची संख्या किती?
आज 823 गोवरबाधित रूग्णांचे निदान करण्यात आले आहे. तर, तब्बल 12,841 संशयित रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. गोवरमुळे मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या 18 आहे. यामध्ये 12 मुंबईत, 3 भिवंडी, 2 ठाणे मनपा, 1 वसई विरार मधील रूग्ण होते. राज्यात गोवरची संख्या आठशेच्या पार पोहोचली आहे. त्यामुळे चिंता फारच वाढली आहे.
गोवर संसर्गाची लक्षणे कोणती? (Symptoms of Measles Infection) :
गोवर हा विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजार आहे. हा लसीकरणामुळे टाळता येणारा आजार आहे. हा आजार मुख्यत्वे पाच वर्षांखालील मुलांमध्ये आढळतो. गोवर आजारात सुरुवातीला तीव्र ताप येणे, खोकला, सर्दी अशी लक्षणे अशी लक्षणे आढळतात. तर, दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी साधारण लालसर पुरळ अंगावर येते. काही मुलांना जुलाब, उलटीचा सुद्धा त्रास होतो. हा ताप साधारण पाच ते सात दिवस अंगावर राहतो. यामध्ये काही मुलांना तीव्र श्वसनदाह, न्यूमोनिया, मेंदूवर सूज, एन्केफेलायटीस, अंधत्व, अशा समस्या उद्भवू शकतात. तसेच, यामध्ये मुलं दगावण्याची सुद्धा भीती असते.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
