APMC Market News : एपीएमसी मार्केटमध्ये प्रवेशाशाठी मास्क अनिवार्य, ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर कडक नियम
कोरोना विषाणू ओमायक्रॉन या नव्या व्हेरियंटच्या मदतीने पुन्हा एकदा डोकं वर काढत आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह सर्व प्रशासनं नियम कडक करण्याच्या प्रयत्नात आहे.
मुंबई : संपूर्ण जगाची डोकेदुखी वाढवणाऱ्या कोरोना विषाणूने ओमायक्रॉन (Omicron) या नव्या व्हेरियंटच्या मदतीने पुन्हा डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रशासनाने निर्बंध पुन्हा कडक करण्यास सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर एपीएमसी मार्केट (APMC Market) प्रशासनही सज्ज झालं आहे. एपीएमसीमध्ये प्रवेशासाठी मास्क अनिवार्य करण्यात आला असून ग्राहक, व्यापारी, कामगार सर्वांनीच मास्क घालणे
सक्तीचे करण्यात आला आहे.
एपीएमसीच्या पाचही बाजारपेठेच्या उपसचिवांना बाजार आवारात मास्क अनिवार्य करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी ट्रक ड्रायव्हर, माथाडी कामगार, व्यापारी तसेच येणाऱ्या ग्राहकांचे संपूर्ण लसीकरण आणि मास्क अनिवार्य केले आहे. तसेच लसीकरणाची व्यवस्थाही एपीएमसी प्रशासनाने केली आहे.
गर्दी कमी करण्यासाठी नवे नियम
एपीएमसी मार्केट्समध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी रोजच होत असते. दरम्यान भाजी आणि फळ मार्केटमध्ये एकाचवेळी सर्व आवक न आणता टप्प्या टप्प्याने आणून गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे. एपीएमसीचे सभापती अशोक डक यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
'ओमायक्रॉनला न घाबरता काळजी घेणं आवश्यक'
ओमायक्रॉन हा झपाट्याने पसरणारा व्हायरस असला तरी त्याला जास्त घाबरण्याची गरज नाही. फक्त योग्य ती खबरदारी घेऊन त्यापासून कसे वाचता येईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, आणि शक्यतो डबल मास्कचा वापर करणे महत्त्वाचे आहे. तसेच कोरोनाची लक्षणे दिसल्यास चाचणी करून घ्यावी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांना सतर्क करण्याची आवश्यकता आहे. तसंच हा आजार अंगावर न काढता त्वरीत उपचार घेणं गरजेचं असल्याचं कोविड टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी सांगितली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- Omicron variant : दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनची तीव्रता मंदावली, मृत्यू दरातही घसरण
- 'ओमायक्रॉन' मुंबईच्या उंबरठ्यावर? हाय रिस्क देशातून आलेले 9 जण कोरोनाबाधित
- Omicron : ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर, सुरक्षेसाठी कशी घ्याल काळजी?
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha